मंगेश पाडगावकर
परवा मंगेश पाडगावकर देवाघरी गेले!! कित्येकांनी आपल्या परीने आणि विचाराने श्रद्धांजली दिली आहे!! ते गेल्यानंतर मला कुठेतरी वाचलेली एक आठवण मी देत आहे. हि आठवण पाडगावकर जेव्हा काव्यक्षेत्रात तसे नवीन होते त्याकाळची आहे. आजच्या जमान्यातील नवोदित क्रिकेटपटूना जर महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर कडून जर शाबासकी किंवा प्रोत्साहन मिळाले तर ते नक्कीच धन्य होतील!! जे आजचे स्थान क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकर याचे आहे एच स्थान त्याकाळात तात्यासाहेब शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचे होते!! पाडगावकर यांच्या काळातील कवींचे श्रद्धास्थान हे तात्यासाहेब होते!! तेव्हा त्याच्या पहिला कवितासंग्रह जिप्सी प्रसिद्ध झाला तेव्हा पाडगावकरांनी त्याची ऐक प्रत तात्यासाहेबांना पाठवली व अभिप्राय लिहिण्याची विनंती केली!! अभिप्रायाची प्रतीक्षा पाडगावकर करत होते सहा महिन्याच्या वर उलटून गेले आणि तात्यासाहेबांचा अभिप्राय काही आला नाही. आणखीन काही महिने गेल्यावर ऐक आंतरदेशीय पत्र त्यांना मिळाले त्यात तात्यासाहेबांचा अभिप्राय होता तो असा तुमचा कविता संग्रह मिळाला धन्यवाद!! कवितासंग्रःतील प्रत्येक कविता मी वाचून त्यावर विचार करत होता कविता करताना कवीची मानसिकता काय आहे त्यानुसार मी कवितेचा अर्थ लक्ष्य घेत होतो. सगळ्या कविता वाचल्यानंतर मी अश्या निर्णयावर येउन पोहोचलो आहे इतक्या सुंदर कविता लिहिणारा कवी असताना मी निवृत्ती घेतली तरी चालेल!! इतका चांगला अभिप्राय ऐक प्रतिभावंत दुसर्या प्रतिभावंताला क्वचितच देईल!!
माझे मित्र श्री चंद्रशेखर उर्फ तात्या अभ्यंकर यांच्या मतानुसार पाडगावकर असे प्रतिभावंत होते त्यांच्या देवाघरी जाण्याने आपण काय गमावलाय याची पूर्ण जाणीव आज होणार नाही!! पुढील काही वर्ष जेव्हा आपण त्यांच्या कविता वाचनात येतीलकिंवा आपण त्यांनी लिहिलेली गाणी ऐकू तेव्हा आपण काय गमावलाय याची तीव्र जाणीव होईल!! मला तात्या अभ्यंकरांचा हा विचार पटला!! कारण आज जेव्हा कै ग दि माडगुळकर, कै शांता शेळके, कै आरती प्रभू, कै सुरेश भट वैगरे महान कवींच्या कविता वाचनात येतात किंवा त्यांची गाणी ऐकतो तेव्हा हे कवी आपल्यात नाहीत याची जेव्हा जाणीव मनात येते तेव्हा आपण काय गमावलाय याची जाणीव तीव्रतेने होते!! कै मंगेश पाडगावकर हे असेच कवी होते!! आणखीन काय लिहु ईश्वर मृताम्यास शांती देवो
No comments:
Post a Comment