राग बिलासखानी तोडी
सकाळी ऐक्ण्याजोगा राग बिलासखानी तोडी. हा राग मिया तानसेन यांचे सुपुत्र बिलासखान याने निर्माण केला असे म्हटले जाते!! तानसेन आपल्या मुलाच्या गाण्यावर खुश नव्हता पण मुलाने जे निर्माण केले त्याला तोड नाही!! केवळ या रागामुळे बिलासखान यांची आठवण आजही उरली आहे!! राग भैरवीच्या जवळचा असा राग आहे!! अतिशय ग्रेसफुल असस राग आहे!! बर्याच गायकांनी गौण आणि वडकी वाजवून त्याला समृद्ध नाकी केले आहे!!
वरील चित्रफितीमध्ये विदुषी मालिनी राजूरकर यांनी हा राग अतिशय समर्थपणे सदर केला आहे साथीला आहेत मुकुंदराव काणे आणि पंडित गोविंदराव पटवर्धन!! मुकुंदराव काणे यांच्याविषयी एवढेच लिहीन अमेरिकेत राहून सुद्धा शिकलेली कला त्यांनी अतिशय उत्तम रीतीने जोपासली आहे!! बाकी काही आणखीन जाणकार मंडळी यावर जास्त लिहितील!! मालिनीताई यांच्या गाण्याविषयी मी जास्त काही लिहिणार नाही फक्त एवढेच त्यांचे गाणे ऐक विलक्षण आहे!! आज गायिकांमध्ये विदुषी किशोरीताई यांचे नाव प्रथम येते किशोरीताई या निसंशय महान आहेत पण मालिनीताई माझ्या तेवढ्याच महान गायिका आहेत पण एकच खंत आहे त्यांच्या गायाकीप्रमाणे त्यांना अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नाही!! आजही वय असून तब्येतीच्या काही तक्रारी मध्ये ऐकल्या होत्या असे असूनही आजही मर्यादित स्वरुपात का होईना त्या आपले गाणे सादर करत आहेत हे रसिकांचे नक्कीच भाग्य आहे!! मला पुणेकर मंडळीचा हेवा वाटतो कारण मालिनीताई यांच्या मैफली नित्यनियमाने पुण्यात होत असतात!! त्यांना उदंड आयुष्य लाभी एवढीच पर्मेश्वर्चारणी प्रार्थना!!
जुन्या जमान्यातील गायिका आणि किरण घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान यांची कन्या तसेच विदुषी हिराबाई बडोदेकर यांची भगिनी विदुषी सरस्वतीबाई राणे यांनी गायलेला हाच राग किराणा शैलीत गायला आहे!!
उस्ताद आली अकबर खान यांनी हाच राग ऐक वेगळ्या ढंगात सादर केला आहे!!
मरहूम उस्ताद विलायतखान यांची सतार गायची असे म्हणतात त्याच्या प्रत्यय येथे घ्या!!
कित्येक वर्षांपूर्वी कै दत्त डावजेकर यांनी सुखाची सावली याचीत्रापात या रागाचा फार सुंदर उपयोग केला आहे आणि हे गाणे त्याकाळी अतिशय गाजले
तसेच हिंदी चित्रपटात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी ऐक याच रागात कायम लक्षात राहील असे गाणे दिले आहे
No comments:
Post a Comment