पान खाये सैय्या हमारो
पान खाये सैय्या हमारो
हे शब्द खरे तर कै शैलेंद्र यांना सुचले कै दादाबर्मन यांच्याकडून. दादाबर्मन यांचा वेश बहुतेक वेळा कुर्ता आणि बंगाली धोतर असा असे आणि दिवसातून ठराविक वेळेला पान खात असत आणि कवीला ऐक कल्पना मिळाली जर पान खाल्ल्यानंतर जर मुखरस कुर्त्यावर पडला तर हि कल्पना शैलेंद्र यांनी आपल्या शब्दात मांडली. वास्तविक हे गाणे बंदिनी या चित्रपटा करता लिहिले होते आणि बर्मनदा यांनी त्याला चाल पण दिली. पण बर्याच विचारान्ती असे ठरले गाण्याच्या शब्दाला लागणारे वातावरण बंदिनी सारख्या चित्रपटात नव्हते म्हणून हे गाणे बंदिनी चित्रपटात ठेवले नाही. नंतर हेच गाणे शैलेंद्र यांच्याकडे पडून राहिले.
जेव्हा शैलेंद्र यांनी तिसरी कसम हा चित्रपताची निर्मित करायला घेतली तेव्हा हे गाणे त्या चित्रपटात योग्य ठिकाणी वापरले. या चित्रपटाला वास्तविक बर्मनदा यांनी संगीत द्यावे अशी शैलेंद्र यांची खरी इच्छा होती. पण त्याकाळात चित्रपट व्यायसायिक एकमेकांचे जवळचे मित्र होते असे असताना तिसरी कासमची कथा शैलेंद्र यांनी राज कपूर यांना ऐकवली आणि राज कपूर यांना कथा आवडली आणि त्यात काम करायची इच्छा दर्शवली आणि राज कपूर यांचा चित्रपटात प्रवेश झाल्यामुळे बर्मनदा हे बाजूला फेकले गेले आणि राज कपूर यांच्या कंपूतील शंकर जयकिशन हे संगीतकार म्हणून आले. खरेतर शंकर आणि जयकिशन हे अगोदर चाल देत असत आणि कवी त्यावर शब्द लिहित असे पण शैलेंद्र यांनी आपले गायक मित्र मुकेश यांची मदत घेऊन शंकर यांना पटवले कि या चित्रपटात हे लिहिलेले शब्द योग्य आहेत आणि शंकर यांनी तयार शब्दांना चाल द्यावी आणि काही प्रयत्न केल्यानंतर शंकर हे तयार झाले आणि त्यांनी अजरामर चाल दिली. माझ्या मते या गाण्याच्या यशात खरे श्रेय संगीतकाराचे कमी असून कवी शैलेंद्र गायिका आशा भोसले आणि पाड्यावर नृत्य आणि अभिनय केलेल्या वहिदा रहमान या तिघांचा वाट जास्त आहे!!
शैलेश दामले १५-मे-२०१६

No comments:
Post a Comment