Thursday, December 31, 2015

मंगेश पाडगावकर 

परवा मंगेश पाडगावकर देवाघरी गेले!! कित्येकांनी आपल्या परीने आणि विचाराने श्रद्धांजली दिली आहे!! ते गेल्यानंतर मला कुठेतरी वाचलेली एक आठवण मी देत आहे. हि आठवण पाडगावकर जेव्हा काव्यक्षेत्रात तसे नवीन होते त्याकाळची आहे. आजच्या जमान्यातील नवोदित क्रिकेटपटूना जर महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर कडून जर शाबासकी किंवा प्रोत्साहन मिळाले तर ते नक्कीच धन्य होतील!! जे आजचे स्थान क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकर याचे आहे एच स्थान त्याकाळात तात्यासाहेब शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचे होते!! पाडगावकर यांच्या काळातील कवींचे श्रद्धास्थान हे तात्यासाहेब होते!! तेव्हा त्याच्या पहिला कवितासंग्रह जिप्सी प्रसिद्ध झाला तेव्हा पाडगावकरांनी त्याची ऐक प्रत तात्यासाहेबांना पाठवली व अभिप्राय लिहिण्याची विनंती केली!! अभिप्रायाची प्रतीक्षा पाडगावकर करत होते सहा महिन्याच्या वर उलटून गेले आणि तात्यासाहेबांचा अभिप्राय काही आला नाही. आणखीन काही महिने गेल्यावर ऐक आंतरदेशीय पत्र त्यांना मिळाले त्यात तात्यासाहेबांचा अभिप्राय होता तो असा तुमचा कविता संग्रह मिळाला धन्यवाद!! कवितासंग्रःतील प्रत्येक कविता मी वाचून त्यावर विचार करत होता कविता करताना कवीची मानसिकता काय आहे त्यानुसार मी कवितेचा अर्थ लक्ष्य घेत होतो. सगळ्या कविता वाचल्यानंतर मी अश्या निर्णयावर येउन पोहोचलो आहे इतक्या सुंदर कविता लिहिणारा कवी असताना मी निवृत्ती घेतली तरी चालेल!! इतका चांगला अभिप्राय ऐक प्रतिभावंत दुसर्या प्रतिभावंताला क्वचितच देईल!!

माझे मित्र श्री चंद्रशेखर उर्फ तात्या अभ्यंकर यांच्या मतानुसार पाडगावकर असे प्रतिभावंत होते त्यांच्या देवाघरी जाण्याने आपण काय गमावलाय याची पूर्ण  जाणीव आज होणार नाही!! पुढील काही वर्ष जेव्हा आपण त्यांच्या कविता वाचनात येतीलकिंवा आपण त्यांनी लिहिलेली गाणी ऐकू तेव्हा आपण काय गमावलाय याची तीव्र जाणीव होईल!! मला तात्या अभ्यंकरांचा हा विचार पटला!! कारण आज जेव्हा कै ग दि माडगुळकर, कै शांता शेळके, कै आरती प्रभू, कै सुरेश भट वैगरे महान कवींच्या कविता वाचनात येतात किंवा त्यांची गाणी ऐकतो तेव्हा हे कवी आपल्यात नाहीत याची जेव्हा जाणीव मनात येते तेव्हा आपण काय गमावलाय याची जाणीव तीव्रतेने होते!! कै मंगेश पाडगावकर हे असेच कवी होते!! आणखीन काय लिहु ईश्वर मृताम्यास शांती देवो 

Sunday, December 20, 2015

पैन्ग्बरवासी उस्ताद बडे गुलाम आली खान 

पै उस्ताद बडे गुलाम अली खान ऐक वेगळेच रसायन होते!! मारवा आणि पुरिया सारखे जवळचे स्वर असलेले राग ऐका पाठोपाठ गात नाहीत कारण राग जरी जवळचे असले तरी दोन वेगळे राग वेगळे वातावरण निर्मिती करतात त्यामुळे ऐका पाठोपाठ शक्यतो गाऊ नयेत असे जाणकार सांगतात!! पण खांसाहेबांचे गायकीवरचे प्रभुत्व उच्च दर्जाचे होते!! १९४४ साली मुंबईत प्रथम झालेल्या मैफलीत मारवा आणि पुरिया ऐका पाठोपाठ म्हणून खासाहेबांनी रसिकांची तसेच जाणकारांची वाह व मिळवली होती अशी नोंद आहे!!
मैफलीत खांसाहेबाना अपेक्षित ठेका तबलजीकडून मिळाला नाही कि फक्त ठुमर्या गाऊन वेळ मारून नेत अशी पण नोंद आहे!!
कै जी ऐन जोशी ऐक आठवण जरूर सांगतात एकदा खांसाहेब त्यांच्या घरी आंब्यांच्या दिवसात दुपारी आले होते तेव्हा साहजिकच भोजनास आमरस पुरीचा बेत होता. खांसाहेब तब्येतीत जेवले जेवण संपल्यावर आमरस एवढा आवडला कि नंतर त्यांनी चार वाट्या रस प्यायले. आणि नंतर गायचा मूड लागला तेव्हा तंबोरे लावून २-३ आस तब्येतीत गायले!! असे अवलिया कलाकार होते!!
अवलिया असल्याची आणखीन ऐक आठवण. त्यांचा उत्तर कर्नाटकात कोठे तरी ऐका छोट्या गावात मैफल ठरली!! संध्याकाळी मैफलीच्या ठिकाणी ते आणि त्यांचे साथीदार पोचले पण ती वेळ त्यांची नव्हती आणि मैफिलीत गाणे बिलकुल रंगले नाही साधारण रात्री १ वाजता त्यांनी रसिकांची माफी मागून मैफल आवरली आणि ते साथीदार आणि जमलेले रसिक रेल्वे स्टेशनात आहे जमलेले बहुतेक सर्व रसिक त्यांना निरोप देण्यास जमले होते. स्टेशनवर आल्या नंतर त्यांना गायची इच्छा झाली आणि गाडीची वेळ होई पर्यंत ते तेथील रसिकांना तेथेच गाणे ऐकवले!!
मैफलीत त्याकाळी पाच हजार रुपये खांसाहेब जेव्हा मोगले आझम या चित्रपटाकरता गायला जेव्हा संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के असिफ यांनी पाचारण केले तेव्हा त्यांना गाण्याची इच्छा नव्हती म्हणून टाळण्याकरता त्यांनी ऐका गाण्याचे २५००० रुपये मानधन सांगितले (त्याकाळात आघाडीचे गायक ३०० ते ५०० रुपये मानधन घेत असत) आणि असिफ यांनी ते देऊ केले!! जेव्हा ध्वनीमुद्रण सुरु होते तेव्हा त्यांनी ऐक आक्रमक तान घेतली आणि नौशाद म्हणाले यागाण्यात आक्रमक तान नको आहे पण त्यांना काही सुचत नव्हते तेव्हा ते म्हणाले मला केलेले चित्रीकरण दाखवा!! चित्रीकरण बघताना जवळ बसलेल्या उस्ताद निझामुद्दीन खान (तबलजी) यांना म्हणाले ये लौंडीया (अभिनेत्री मधुबाला ) तो बहोत खुबसुरत है!!
एकदा देवधर मास्तर आणि खांसाहेब मुंबईत रस्त्यावर फिरत होते आणि तेव्हा त्या दोघांना ऐक नखरेल तरुणी दिसली तिच्याकडे बघून त्यांची तबियत एकदम खुश झाली आणि म्हणाले चल तुमच्या विद्यालयात चला तुम्हाला ऐक ठुमरी ऐकवतो आणि नंतर त्यांनी अशी काय रसिली ठुमरी ऐकवली कि त्याची आठवण आयुष्यभर राहावी अशी आठवण देवधर मास्तर लिहितात!! तसेच मुंबईत पावसाळ्यात marine drive येथे जसे पावसाचे पाणी ज्यावेगाने वर उसळी मारत होते त्याच वेगात ते मल्हार रागाच्या ताना घेत होते अशी आठवण पण देवधर मास्तर लिहितात
लाहोर येथे जन्मलेले खांसाहेब फाळणीनंतर तेथेच राहिले पण पाकिस्तानात जेवढा गझल गायकाला जेवढा मान मिळतो तेवढा मान शास्त्रीय आणि घराणेदार गायकाला मिळत नाही याची त्यांना खंत होती. काही वर्ष ६ महिने हिंदुस्थान आणि ६ महिने पाकिस्तानात राहत. त्यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री कै मुरारजी देसाई यांना हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळण्याकरता मदतीची विनंती केली. मुरारजी देसाई यांनी रसिकांवर मोठे उपकार केले आणि खांसाहेब हिंदुस्थानचे नागरिक झाले
ख्यालगायकी प्रमाणे ठुमरी म्हणण्यात त्यांचा हातखंड होता!! तसेच हरी ओम तत्सत सारखे भजन पण नेहेमी गात असत. आपण जेव्हा त्यांनी गायलेले हे भजन ऐकल तेव्हा धर्माच्या रेषा कश्या नाहीशा होतात याची अनुभूती होईल!!
गानसरस्वती लतादीदी या त्यांच्या ऐक मोठ्या चाहत्या होत्या आणि १९५६ साली कोलकाता येथे ऐका संगीत समारंभात त्यांनी स्वरसाथ केली आहे आणि साथ करताना ऐक तान अशी काय घेतली कि खांसाहेबांनी तेथेच शाबासकी दिली अशी नोंद आहे!!
आंतरजाळावर त्यांची काही जुनी ध्वनीमुद्रणे वरचेवर येत आहेत हे रसिकांचे भाग्याच आहे!!
वरील ध्वनिफितीमध्ये १९५० च्या सुरुवातीला राग मारवा गायला आहे. आवाजाची प्रत (Sound Quality) फार उत्तम नाही आहे पण काय गात आहेत याची प्रचीती नक्कीच येते.
आणखीन काय लिहू!! मारवा ऐकताना ज्या वाचलेल्या आठवणी मनात येत गेल्या त्या येथे लिहिल्या आहेत!! या संगीत साधकास माझे दंडवत

राग बैरागी 

आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात सकाळी गायचे अनेक सुंदर राग आहेत त्यात आहे राग बैरागी. काही लोक त्याला भैराव्चाच प्रकार मानतात. पण शास्त्रात न गुंतता आपण या रागाचा आस्वाद जरूर घेवूया!!
आजच्या युगातील आघाडीची गायक जोडी आहे पंडित राजन आणि साजन मिश्र ऐक सपक गायकीचे उत्तम उदाहरण!! त्यांनी गायलेला राग बैरागी अप्रतिम आहे
येथे उस्ताद आमिरखान यांनी गायलेली ऐक बंदिश त्यात उत्तम प्रकारे ईश्वराची आळवणी केली आहे!!

पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची मधुर बासरी 

उस्ताद बिस्मिल्लः खान यांच्या सनईच्या स्वरात ऐक वेगळा अविष्कार दिसतो

पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी कित्येक गाण्यांना आपल्या बासरीची जोड दिली आहे ये अभंगात जी दिली आहे ती कायम लक्षात राहील!! लाजबाब आहे. माउलींच्या शब्दांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेली पूरक चाल आणि जोडीला गानसरस्वतीचा स्वर ऐक नक्षत्रांचे देणे तयार झाले आहे!!

संत एकनाथ महाराजांच्या शब्दांना ऐक उत्तम चाल दिली आहे ती श्रीधर फडके यांनी. ऐक लाजबाब चाल आहे बरोबर सुरेश वाडकर यांची समर्थ गायकी मग काय ऐक महान कलाकृती निर्माण होणारच तसेच यात ज्यांनी सतार वाजवली आहे त्यात भक्तिरस ओथम्बुन वहात आहे असे वाटते!!

आशालता वाबगावकर या काही रागदारी शिकलेल्या गायिका नाहीत पण त्यांच्या गायकीला पेलेल अशी संगीत रचना अभिषेकी बुवांनी मत्स्यगंधा नाटकात दिली आहे. लावणीचा बाज असलेली रचनेचे शब्द आहेत कवी बालकवी यांचे

हिंदी चित्रपट गीतात माझ्या माहिती प्रमाणे ऐक गझल आहे ती येथे देत आहे 

कित्येक वर्षे मैफली ऐकलेल्या मित्रांना विनंती त्यांनी नक्कीच कोणाचा राग बैरागी मैफलीत ऐकला असेल त्यांनी त्या रागाची असलेली आठवण येथे जरूर लिहा!!

Saturday, December 19, 2015

राग बिलासखानी तोडी 

सकाळी ऐक्ण्याजोगा राग बिलासखानी तोडी. हा राग मिया तानसेन यांचे सुपुत्र बिलासखान याने निर्माण केला असे म्हटले जाते!! तानसेन आपल्या मुलाच्या गाण्यावर खुश नव्हता पण मुलाने जे निर्माण केले त्याला तोड नाही!! केवळ या रागामुळे बिलासखान यांची आठवण आजही उरली आहे!! राग भैरवीच्या जवळचा असा राग आहे!! अतिशय ग्रेसफुल असस राग आहे!! बर्याच गायकांनी गौण आणि वडकी वाजवून त्याला समृद्ध नाकी केले आहे!!
वरील चित्रफितीमध्ये विदुषी मालिनी राजूरकर यांनी हा राग अतिशय समर्थपणे सदर केला आहे साथीला आहेत मुकुंदराव काणे आणि पंडित गोविंदराव पटवर्धन!! मुकुंदराव काणे यांच्याविषयी एवढेच लिहीन अमेरिकेत राहून सुद्धा शिकलेली कला त्यांनी अतिशय उत्तम रीतीने जोपासली आहे!! बाकी काही आणखीन जाणकार मंडळी यावर जास्त लिहितील!! मालिनीताई यांच्या गाण्याविषयी मी जास्त काही लिहिणार नाही फक्त एवढेच त्यांचे गाणे ऐक विलक्षण आहे!! आज गायिकांमध्ये विदुषी किशोरीताई यांचे नाव प्रथम येते किशोरीताई या निसंशय महान आहेत पण मालिनीताई माझ्या तेवढ्याच महान  गायिका आहेत पण एकच खंत आहे त्यांच्या गायाकीप्रमाणे त्यांना अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नाही!! आजही वय असून तब्येतीच्या काही तक्रारी मध्ये ऐकल्या होत्या असे असूनही आजही मर्यादित स्वरुपात का होईना त्या आपले गाणे सादर करत आहेत हे रसिकांचे नक्कीच भाग्य आहे!! मला पुणेकर मंडळीचा हेवा वाटतो कारण मालिनीताई यांच्या मैफली नित्यनियमाने पुण्यात होत असतात!! त्यांना उदंड आयुष्य लाभी एवढीच पर्मेश्वर्चारणी प्रार्थना!!
जुन्या जमान्यातील गायिका आणि किरण घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान यांची कन्या तसेच विदुषी हिराबाई बडोदेकर यांची भगिनी विदुषी सरस्वतीबाई राणे यांनी गायलेला हाच राग किराणा शैलीत गायला आहे!!
उस्ताद आली अकबर खान यांनी हाच राग ऐक वेगळ्या ढंगात सादर केला आहे!!
मरहूम उस्ताद विलायतखान यांची सतार गायची असे म्हणतात त्याच्या प्रत्यय येथे घ्या!!

कित्येक वर्षांपूर्वी कै दत्त डावजेकर यांनी सुखाची सावली याचीत्रापात या रागाचा फार सुंदर उपयोग केला आहे आणि हे गाणे त्याकाळी अतिशय गाजले

तसेच हिंदी चित्रपटात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी ऐक याच रागात कायम लक्षात राहील असे गाणे दिले आहे

Raag Darbari - Few Glimpses

I am huge fan of late Pandit Pannalal Ghosh. Thanks to my close friend Sanjay Vyas who introduced Pandit Pannalal to me. I am equally huge fan of late Pandit Nikhil Bannerjee.
Raag Darbari - Pandit Pannalal

Raag Darbari - Pandit Nikhil 
Both artist have played the same raag but but see the difference between both instruments and presentation

ऐक विनोद किस्सा 

नमस्कार मंडळी सध्या गिरीश कुबेर लिखित टाटायान नावचे पुस्तक वाचत आहे त्या पुस्तकात समस्त तट मंडळींचा इतिहास आहे. तट समूहाचा देशाच्या जडण घडणीत कसा सिंहाचा वाटा होता. तसेच पुस्तकात एयर इंडिया कशी सरकारने पर्यायाने पंडित नेहरू यांनी दिवसा ढवळ्या दरोडा घालून चोरली याची समग्र कथा आहे!! याच पुस्तकात वाचलेला ऐक विनोदी किस्सा त्य्हेथे लिहित आहे.
श्रीमान रूसी मोदी हे १९३९ ते १९९३ पर्यंत टाटा स्टील कंपनीत कामाला होते हा माणूस कामाला फार उत्तम पण थोडा काही बाबतीत चक्रम असा होता आणि बरेच वर्ष कंपनीच्या उच्चपदावर पण होते!! आपल्या पैकी काही लोकांनी बॉम्बे हाउस नावाची मुंबईतील फोर्ट विभागात असलेली टाटा समूहाची मुख्य इमारत बघितली असेल आणि नसेल बघितली एकदा जरूर बघा हि विनंती. एकदा रूसी मोदी या इमारतीत कामाला आहे होते आणि इमारती बाहेरील रस्त्यावर आपली गाडी पार्क करत होता आणि त्याने क्गडी व्यवस्थित न पार्क केल्याने लगेच ऐक हवालदाराने हटकले आणि सांगितले गाडी नित लावा आणि मोदी हो म्हणाले आणि वासविक संभाषण येथेच थांबल्यला हवे पण मोदी त्यानंतर हवालदाराला काहीतरी अद्वातद्वा बोलले आणि राग येउन हवालदाराने विचारले रस्ता तेरे बाप क्या ही क्या? तेव्हा रूसी मोदी यांनी रस्त्याच्या फलकाकडे बोट दाखवत म्हणाले येह मेरे बाप काही नाम है कोई शक है क्या? रस्त्याचे नाव होते होमी मोदी स्ट्रीट आणि सर होमी मोदी रूसी मोदी यांचे खरोखरच वडील होते. तेव्हा हवालदार चाट पडला आणि खाली मान घालून निघून गेला!!

कट्यार चित्रपटातील गाणी 


कट्यारची गाणी दोन तीन वेळा ऐकून मी प्रतिक्रिया लिहित आहे
१. सूर निरागस गाणे ठीक आहे पण चाल पण ठीक आहे पण बुवांच्या चालीची सर नाही!!
२. भोला भंडारी चाल ठीक आहे पण गायकाची नवड चुकीची वाटली त्यामुळे गाणे पडले

३. दिन गेले भजनाविण कट्यार मधील गाणे कुठे भार्गमराव आचरेकर यांची दमदार गायकी आणि शंकरने गायलेले गाणे हे अगदीच आत्मा नसलेले वाटले!! 
४. शंकरने गायलेले घेई छंद मकरंद चांगले आहे
५. लागी करेजवा काटार हि ठुमरी अंगाचे गीत गाणारे आज समर्थ गायक असताना बुवांची ध्वनिमुद्रिका का वापरली हे कळत नाही!! आजच्या गायाकापैकी अभिषेकी बुवांचे कित्येक शिष्य हे गाणे नक्कीच बुवांचा आब ठेवून म्हणून शकले असते!!
६. मन मंदिरा गाणे ठीक आहे पण शंकर रेषांनी या शब्दाचा उच्चार करताना चुकला आहे!!
७. मुरलीधर श्याम परत तेच मुल प्रसाद सावकार यांचे गाणे कुठे आणि हे गायलेले पातळ आमटी सारखे वाटले!!
८. सुरे से सजी गाणे ठीक आहे
९. तेजोनिधी लोह गोल एकट्या राहुलने गायले असते जास्त चांगले असते कारण त्यातील जो आक्रमक गायकीचा अविष्कार शंकरच्या गायकीला विपरीत आहे!! परत वसुधेची लाज राख हि ओळ गाताना उच्चार काही व्यवस्थित झाले नाही!!
बाकी राहुलने गायलेली गाणी चांगली आहेत आपल्या आजोबांच्या गायकाची व्यवस्थित आब राखली आहे!!
मूळ नाटकातील माझे सर्वात आवडते गीत या भवनातील गीत पुराणे या चित्रपटात आहे असे वाटले नाही!!
शंकरची गाणी मर्यादित ठेवीन राहुलची वाढवली असती तर जास्त चांगला झाला असत असे मळता वाटते!! शेवटी कट्यार म्हणजे वसंतराव त्यांची जेवढी या नाटकावर छाप होती तेवढी अन्य गायक कलाकाराची नव्हती!!

तसेच नाकात गाणे हे शंकरच्या गाण्यातील मोठे वैगुण्य आहे ते येथे आड नाक्कीच्व्ह येत आहे!!
नाट्यसंगीत गाताना रस्व आणि दीर्घ याचे उच्चार वेगळे असतात असे वसंतराव म्हणत असत ती गोष्ट येथे काही फारशी जाणवली नाही!!

उत्तम प्रयत्न पण अपेक्षा वाढवून निराशा करणारा!!

राग हमीर 

मधुबन मी राधिका नाचे रे हे गाणे मिल शाळेत असल्यापासून ऐकत असे पण जेव्हा झी टीव्हीवर सारेगामा (सूनु निगम सूत्रधार) हा कार्यक्रम सुरु झला आणि त्यात रागावरची गाणी हि फेरी सुरु झाल्यानंतर शास्त्रीय संगीत ऐक्याची इच्छा निर्माण झाली आणि माझ्या सिंगापूर मधील मित्रमंडळींशी चर्चा करता करता आपल्या अभिजात संगीताची माहिती थोडी थोडी मिळत गेली!! जेव्हा माझा आवडते गाणे हे हमीर रागावर आधारित आहे असे कळल्यानंतर राग हमीर ऐकायची इच्छा झाली आणि आज हमीर हा माझ्या आवडत्या रागांपैकी ऐक आहे!!

माझ्या निरीक्षणातून ऐक गोष्ट नक्कीच जाणवली या रागाला ग्वाल्हेर घराण्याची गायली जास्त पोषक आहे म्हणून ग्वाल्हेर घराण्यातील गायक / गायिका हा राग जास्त गातात याचा अर्थ असा नाही कि इतर घराण्यातील गवई गात नाहीत!!
मी ऐकलेली हमीरची विविध रूपे येथे देत आहे

ग्वाल्हेर घराण्याचे ऐक ज्येष्ठ गायक कृष्णराव शंकर पंडित यांच्या आवाजात ऐका

ग्वाल्हेर घराण्याची आजची आघाडीची गायिका सौ अपूर्व गोखले (पंडित गजाननबुवा जोशी यांची नात) हिच्या आवाजात ऐका https://www.youtube.com/watch?v=QDZdM1brDx0

ग्वाल्हेर आणि जयपूर दोन्ही घराण्याची गायकी गाणार्या आजच्या ऐक समर्थ गायिका विदुषी सौ पदमा तळवलकर यांची धीर गंभीर गायकी. बंदिश आणि तराणा उत्तम जमला आहे https://www.youtube.com/watch?v=0NyfJir90ac

दीपिका भिडे तरुण पिढीची गायिका उत्तम तालीम व गोड आवाज आहे टाय हमीर ऐक वेगळा भासतो

पतियाळा घराण्याचे मरहूम उस्ताद बडे गुलाम अली खांसाहेब (ज्यांच्या गायकीचे वर्णन करण्यात शब्द कमी पडतील)

तसेच पतियाळा घराण्याचे ऐक अप्रसिद्ध गायक पंडित जगदीश प्रसाद यांच्या आवाजात हमीर ऐका

रामपूर घराण्याचे आजचे आघाडीचे प्रसिद्ध गायक उस्ताद रशीद खान यांचा हमीर तेवढाच सुंदर आहे

श्याम चौरासी घराण्याचे गायक उस्ताद सलामत अली ऐक जबरदस्त गायकी
सलामत आली आणि नजाकत आली यांची गायली अशी आहे जेवढे ऐकत जाल तेवढी आस्ते कदम या गायकीची धुंदी तुमच्या मनावर चढत जाते ती पटकन उतरत नाही!!

पंडित सी आर व्यास यांचे शिष्य आणि आग्रा घराण्याचे आजच्या पिढीचे गायक संजीव चिमलगी यांचा हमीर

डॉक्टर ऐन राजम - गायकी अंग व्हायोलीनवर राग हमीर ऐका

उस्ताद शहीद परवेझ

उस्ताद विलायत खान

हमीर रागावर थोडी फार गाणी पण आहेत
रफीसाहेब यांच्या आवाजातील मधुबन मी राधिका नाचे रे

संगीत मानापमान नाटकातील नमन नटवरा

संगीत विद्याहरण नाटकातील विमल अधर

तसेच विख्यात गायिका आशा भोसले यांच्या आव्जातील केदार हमीर ची छाया असलेले ऐक माझे आवडते गीत

राग मारवा 

मावळत्या दिनकरा हे गीत माझे तसेच माझ्या आई वडिलांचे आवडते गीत आहे हे गीत मी अगदी बालवयापासून ऐकत आहे जेव्हा शब्दाचा अर्थ काळात नसतो त्याकाळात फक्त एकच गोष्ट माझ्या लक्षात राहिली आहे जेव्हा लतादीदी सुरुवातील मावळत्या जे शब्द गाताना जो आर्त भाव व्यक्त करतात तोच माझ्या कायम लक्षात राहिला आहे.
या काव्यावर / गीतवर तसेच भास्करराव तांबे यांच्यापासून सुरेश भट यांच्यासारख्या प्रतिभावान कवींच्या कविता सुधीर फडके यांच्या पासून श्रीधर फडके यांच्यापर्यंत विविध संगीतकार मंडळीनी गाण्यात रुपांतर केले आहे ती गाणी जोवर मराठी भाषा जिवंत आहे तोपर्यंत ऐकली जातील (इंग्रजी भाषेतील Dunkirk वरील वाक्याचा वापर करायचा मोह मला आवरला नाही)
जो भाव मला मावळता दिनकर मध्ये सापडला तोच भाव मला सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या शब्द शब्द जपून ठेव या कवितेत / गीतात. मंगेश पाडगावकर यंच्या शब्दांना कै विश्वनाथ मोरे यांनी अतिशय उत्कृष्ट चाल दिली आहे. तच आर्त भाव गणाच्या सुरुवातील वाजवलेल्या बासरीत पण मिळेल!! हेच गीत एकदा सुरेश वाडकर यांनी ETV वरील ऐका कार्यक्रमात तितक्याच ताकदीने पेश केले होते
अगदी तसाच भाव सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या ऐका अप्रसिद्ध अभंगात पण सापडला. अभंगाचे शब्द आहेत मायेंविण बाळ क्षणभरी न राहे तुकोबांच्या शब्दांना कमलाकर भागवत यांनी जबरदस्त चाल दिली आहे!!
तोच आर्त भाव ऐक वेगळ्या परिभाषेत मला शास्त्रीय संगीत ऐकयला लागल्यानंतर कै वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या मारवा रागात मिळाला. वसंतराव यांच्या गायकीचे वर्णन करायला शब्द कमी पडतील. सामान्य माणसाची कल्पना शक्ती बधिर होईल असे चकित करणारे अनुभूती वसंतराव गाताना देत. वसंतराव यांचा मारवा कधीच विसरला जाणार नाही!! मारवा गाताना लयीशी खेळ करत व्यक्त केलेला भाव तुम्हाला अंतर्मुख करतो !!
आमचे ऐक मित्र आहेत श्री प्रफुल्ल पेंढारकर यांच्याशी राग मारवा बद्दल गप्पा मारताना त्यांनी उस्ताद अमीर खान आणि पंडित जसराज यांच्या मारव्याचा उल्लेख केला. उस्ताद आमिरखान यांनी सदर केलेला मारवा ऐक विलक्षण आहे. अमीर खान यांच्या ठाय लयीत धीरगंभीर आवाजात मारवा रागाचे गंभीर रूप समजते!! उन्हाळ्यातील ऐका शांत संध्याकाळी तवसाळ किंवा वेळणेश्वर सारख्या निसर्गरम्य ठिकाणी शांततेने सूर्यास्त बघावा तोच आनंद मला उस्ताद अमीरखान यांचा मारवा ऐकताना मिळाला 

पंडित जसराज यांनी सादर केलेला आमिरखान यांच्या पठडीतला आहे पण उस्ताद अमीर खान यांची गायकीची उंची हि वेगळीच आहे!!

माझा मित्र श्री योगेश गोंधळेकर याच्याशी शास्त्रीय संगीताबद्दल वोलताना त्याने पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायकीचा उल्लेख केला होता आणि जेव्हा कशाळकरबुवा यांची काही सीडीज मी ऐकल्या पण ते ऐकल्यानंतर मला असे वाटले कि कशाळकरबुवा हे फार पुस्तकी (theoretical) आहेत पण २००६ साली सवाई गन्धर्वे महोत्सवात त्यांनी गायलेला मारवा आजही अंगावर काटा उभा करतो अगदी सूर्यास्ताची वेळ होती आणि कुठेही आक्रमक गायकी सादर न करता उल्हासजी जी गायकी गायली त्यातून मी दोन गोष्टींचा बोध घेतला ऐक योगेश योग्य माणसाची स्तुती करत होता आणि आक्रमक नसलेली गायकी पण फार उत्तम असते. 
(ज्यांना सवाई मधील मारवा ऐकायचा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा)

आता मारवा आठवतो तो अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांनी फेब्रुवारी २०१५ साली सिंगापूर येथे गायलेला मारवा आठवतो कारण duet सादर करताना पहिले आवर्तन गायिले तेव्हा सगळा मारवा डोळ्यापुढे ऐका क्षणात उभा केला तो मारवा कायम लक्षात राहील. अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी आपल्या आजोबा आणि पणजोबा यांची परंपरा योग्य रीतीने पुढे नेत आहेत आणि आजच्या पिढीच्या गायकात पण घराणेदर गायकी कशी टिकून आहे याचे योग्य उदाहरण आहे
पंडित शिवकुमार शर्मा यांनी वाजवलेला मारवा म्हणजे ऐका शिखरावर सूर्यास्ताचे किरण पडल्यावर जसे दिसेल ते चित्र उभे करतो!! 

पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी वाजवलेला मारवा म्हणजे बासरीच्या गोड मधाळ स्वर पण अंतर्मुख करू शकतात याचे उत्तम उदाहरण 

पंडित रवी शंकर यांचा मारवा म्हणजे तंतुवाद्य घेऊन आर्त भाव कसा निर्माण होतो याचे उत्तम उदाहरण 

उस्ताद विलायत खान यांचे वादन म्हणजे सतार कशी गाते आणि अंतर्मख करायला लावते याचे उत्तम उदाहरण 

पण या सगळ्या वाद्यासंगीतावर कडी करणा मारवा आहे पंडित निखिल बनर्जी यांचा गायकी आणि तंत्कारी अंग यांचा सुयोग मिलाप म्हणजे पंडित निखिल यांचे वादन आहे 

जेव्हा ऐका घराणेदार गायकाचा मारवा ऐकल्या नंतर आपण अंतर्मुख होतो तोच भाव मला समृद्धी पोरे दिग्दर्शित 
Dr. Prakash Baba Amte: The Real Hero Full Movie हा चित्रपट बघितल्यानंतर तोच भाव मनात आला. हा चित्रपट पण राग मारवा प्रमाणे अंतर्मुख करणारा आहे. केलेचे मधयम जरी वेगळे असले तरी भाव तोच निर्माण करते

सरते शेवतो परत मावल्या दिनकराची आठवण सिंगापूर येथे डॉक्टर अनिता काळे यांनी एकदा ऐक घरगुती कार्यक्रमात मावळत्या दिनकरा ज्या पद्धतीने सादर केले त्यातील शब्दांची अनुभूती कायम लक्षात राहील
या आठवणी लिहिण्याची प्रेरणा माझी पत्नी सौ शलाका दामले हिने दिली आहे!!
मंडळी आठवण फार लांबली आहे पण कुठे काट छाट करावी असे न कळल्यामुळे जशी लिहिले तशीच ठेवत आहे

संगीतकार रोशन

जेव्हा हिंदी चित्रपटातील अभिजात संगीताचा विषय येतो तेव्हा ऐक नाव न टाळता येण्यासारखे आहे ते संगीतकार रोशन यांचे आहे!!

रोशन यांचे पूर्ण नाव रोशनलाल नागार्थ त्यांचा जन्म १४ जुलै १९१७ साली पंजाबमधील गुजरान्वाला येते झाला लहानवयापासून त्यांना संगीताची आवड होती आणि ते ऐकताना तहानभूक विसरत असे घरचे सांगत!! गाण्याच्या वेडापायी ते घरातून पळून महियर येथे महान संगीत साधक उस्ताद अल्लाउद्दिन खान (पंडित रविशंकर, उस्ताद आली अकबर खान, पंडित निखिल बनर्जी आणि इतर कित्येक महान कलाकारांचे गुरु) यांच्याकडे आले आणि संगीत शिकवण्याची विनंती केली. उस्तादांनी त्यांच्या अवताराकडे पाहून प्रत्यक्ष संगीत शिकवायला नकार दिला पण म्हणाले माझ्या घरी रहा आणि ऐकून ऐकून जेवढे शिकता येईल तेवढे शिक.. उस्तादांचे घर म्हणे ऐक संगीताचे विद्यापीठ होते तेथील सांगतिक वातावरणाचा रोशन यांना निश्चित फायदा झाला.. त्यांचे पुढील शिक्षण मौरीस कौलेज (भातखंडे विद्यापीठ) लखनौ येथे झाले. तेथे श्रीकृष्ण उर्फ अण्णासाहेब रातान्जंकर हे विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर गुरुजनांकडून रोशन यांना व्यवस्थित संगीताचे शिक्षण मिळाले. इसराज या वाद्यावर चांगले प्राविण्य त्यांनी मिळवले.. येथील शिक्षणामुळे त्यांना रेडियोवर नोकरी मिळाली आणि इरा नामक रेडियोवर गायला येणाऱ्या गायिके बरोबर त्यांचे लग्न झाले. तेव्हाच योगायोगाने त्यांची गाठ केदार (काही ठिकाणी किदार असा उल्लेख आहे) शर्मा यांची गाठभेट झाली आणि शर्मा यांनी त्यांना मुंबईत येउन चित्रपट संगीत देण्याचा प्रस्ताव मांडला पण रोशन यांनी तो काही स्वीकारला नाही कारण त्यांना मनापासून शास्त्रीय संगीताची सेवा करायची होती. पण पत्नीच्या आग्रहाखातर त्यांनी मुंबईला येण्याचे ठरवले आणि मुंबईत आल्यानंतर पहिला ब्रेक केदार शर्मा यांनीच दिला चित्रपटाचे नाव होते नेकी और बदी (१९४९). या चित्रपटाबरोबर त्यांना आणखीन ३ असे एकंदर पहिल्या फटक्यात चार चित्रपट मिळाले. हे चित्रपट पडले आणि रोशन यांनी निर्णय घेतला जर अभिजात संगीत चित्रपटांना द्यायचे असल्यास एकावेळी एवढे चित्रपट एकावेळी घ्यायचे नाहीत!! त्यातील बावरे नैन (१९५०) या राज कपूर आणि गीता बाली अभिनित चित्रपटातील दोन गाणी त्याकाळी गाजली ऐक होते राजकुमारी यांनी गायलेले सून बैरी बलम साच बोल रे आणि मुकेश यांनी गायलेले तेरी दुनिया मी दिल लागता नाही!! पुढील यश मिळवण्यास त्यांना ७ वर्ष वात पाहायला लागली आणि मधला काळात नौबहार चित्रपटात ऐका मीराबाईच्या भजनाला त्यांनी ऐक अभिजात चाल दिली https://www.youtube.com/watch?v=s11ZXJ_bopg. हि चाल त्यांनी राग भीमपलास मध्ये बांधली !!

पुढेचे यश त्यांना आजी बस शुक्रिया (१९५८) या चित्रपटाला मिळाले यातील सर्व गाणी त्याकाळात गाजली आणि सर्वात गाजलेले गाणे होते सारी सारी रात तेरी  याद सताये https://www.youtube.com/watch?v=tQaLUtuI8Xw

१९६० साल आले आणि रोशन यांनी मागे वळून बघितले नाही यानंतरचे बहुतेक चित्रपट यशवी ठरले आणि गाणी अगदी सुपरहिट ठरली!! अर्थात गाणी सुपरहिट होण्याकरता रोशन यांनी कसलीही तडजोड केली नाही!!

बाबर (१९६०) साली आलेल्या चित्रपटात सुधा मल्होत्रा यांनी गायलेले राग यमन वर आधारित सलामे हसरत काबुल  करलो https://www.youtube.com/watch?v=QbkgYYt6w40. या गाण्यात पंडित राम नारायण यांनी वाजवलेली सारंगी तेवढीच उठावदार आहे !!

नंतर आलेला बरसात कि रात (१९६०) या चित्रपटातील सर्व गाणी गाजली आणि आजही गायली जातात!!

या नंतर एकेके हिट चित्रपटांची आणि गाण्याची मालिका सुरु झाली
आरती (१९६२), वल्लह क्या बात ही (१९६२), दिल हि तो ही (१९६३), ताज महाल (१९६३), चित्रलेखा (१९६४), दूज का चांद (१९६४), भिगी रात (१९६५), नई उमर की नई फसल (१९६५), देवर (१९६६), ममता (१९६६) आणि शेवटी आलेला अनोखी रात (१९६८). त्या खेरीज ऐक दुर्लक्षित चित्रपट आहे तो नूरजहान (१९६७)

माझ्या मते लोकगीत, गझल, कव्वाली या सर्व गान्प्रकारांवर रोशन यांचे प्राविण्य फार उत्तम होते. कै संगीतकार मदन मोहन हे गझलसम्राट म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी रोशन यांनी त्याच तोडीच्या गझल दिल्या आहेत त्याचे ऐकच उदाहरण पुरेसे आहे.. ममता (१९६६) या चित्रपटात राग तिलंग वर आधारित असलेली गझल रहते थे कभी हम जिंके दिल मे https://www.youtube.com/watch?v=tMiLndLz9hY. .

उत्तम कव्वाली बांध्याची दोन उदाहरणे आहेत ऐक बरसातकी रात मधील राग कलावती वर आधारित न तो कार्व कि तलाश है https://www.youtube.com/watch?v=wP-k7QlB1jQ आणि दुसरी आहे दिल हि तो है मधील यमन रागावर आधारित निगहेन मिलाने को जी चाहता है https://www.youtube.com/watch?v=K5SM4D515Jc

लोकसंगीतावर आधारित ऐक अभिजात गाणे आहे विकल मोरा मनवा सुरुवातील भाग लोकसंगीत आहे!! https://www.youtube.com/watch?v=E_4cnl-M1dY (चित्रपट ममता)

याच चित्रपटातील यमन रागावर आधारित ऐक युगलगीत आहे छुपा लो युन दिल मी प्यार https://www.youtube.com/watch?v=wstxx7H_9fs. ऐक शांत रसातील ऐक उत्तम प्रेमगीत आहे!! यात पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी वाजवलेली बासरी तेवढीच परिणामकारक आहे!!

मदनमोहन हे महान संगीतकार होते यावर कसलेच दुमत नाही पण रोशन पण तेवढेच महान होते आणि त्यांना जेवढे  नावाजायला पाहिजे होते तेवढे नावाजले गेले नाही असे माझे प्रामाणिक मत आहे!!

रोशन यांनी बांधलेल्या गीतात ऐक सर्वात चांगले गीत निवडायचे असल्यास कुठले निवडावे रहे न रहे हम, छुपा लो युन दिल मी प्यार मेरा आणि मन रे तू कहे न धीर धरे या तीन गाण्यात कुठले निवडावे याचा निर्णय घेता येत नव्हता पण माझ्या घरी मुलीचा जन्म झाल्यानंतर मला याचे उत्तर मिळाले आणि आज रोशन यांचे माझ्या मते सर्वोत्तम गीत निवाड्याचे असल्यास मी मेहेलोनका राजा मिल हे गीत निवडेन https://www.youtube.com/watch?v=9H6m056i-tU

रोशन हे मनाने एक संत होते!! १९६० च्या दशकात एकदा राज कपूर आणि शंकर जयकिशन यांच्यात मोठे भांडण झाले आणि राज कपूर यांनी संगीत देण्यास रोशन यांना पाचारण केले. राज कपूरचे चित्रपट म्हणजे पैसे कमावण्याची आणि प्रसिद्धीची मोठी संधी होती पण संत व्यक्तिमत्वाचे रोशन यांनी राज कपूर आणि शंकर जयकिशन यांच्यात परत सुखसंवाद घडवून आणला आणि शंकर जयकिशन यांनी चित्रपटाला संगीत दिले. त्यांचे समकालीन संगीतकारांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यांनी कोणाचीही निंदा कधीच केली नाही!!


रोशन यांचा मृत्यू नोव्हेंबर १६, १९६७ या दिवशी ऐका फिल्मी पार्टीत गेले असता कोणी तरी ऐक विनोद सांगितला त्यावर रोशन हसले आणि हसत असताना छातीत काळ येउन ऐका क्षणात मृत्यू आला!! वय होते फक्त ५०. अवघे १८ वर्ष चित्रपट सृष्टीत त्यांनी काम केले आणि मोठा वारसा मागे ठेवला आहे!! जरी चित्रपट सृष्टीत कार्यरत असले तरी त्यांनी स्वतःची तुतारी कधीच वाजवली नाही आणि सवंग प्रसिद्धीचा मागे कधीच लागले नाही!! थोडेसे अंतर्मुखी व्यक्तिमत्व असलेले रोशन यांना खरेतर शास्त्रीय संगीताची सेवा करायची होती ती त्यांना कधीच करता आली नाही याची खंत कायम त्यांच्या मनात होती आणि ती खंत उराशी बाळगत त्यांच्या अंत झाला!! 

गाणाऱ्याचे पोर - लेखक श्री राघवेंद्र जोशी 


कै भारतरत्न व आपल्या सर्वांचे आदरणीय पंडित भीमसेन जोशी येनच्या ज्येष्ठ चिरंजीवाने लिहिलेलं पुस्तक साधारण दीड वर्षापूर्वी प्रसिद्ध झालं तेव्हा या पुस्तकाने मोठी खळबळ माजवली होती. या पुस्तकाची पार्श्वभूमी थोडक्यात मांडतो. पंडितजी यांची पहिली बायको सौ सुनंदा भीमसेन जोशी हि खरीतर मामेबहीण आणि तिची चार अपत्ये राघवेंद्र, उषा सुमंगला आणि आनंद. पंडितजींच्या पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी त्याच्या आयुष्यात शिष्या म्हणून आलेल्या वत्सला मुधोळकर यांच्याशी झालेला दुसरं लग्न व त्यांच्यापासून झालेली तीन अपत्ये जयंत, शुभदा आणि श्रीनिवास. हि कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. 

पंडितजी यांच्याबरोबर राघवेंद्र यांना लहानपणाचे  बगामी आणि नागपूर येथील दिवस तसेच पंडितजी यांचा आजारपणामुळे गेलेला आवाज या काही ठळक गोष्टी पुस्तकात सविस्तर दिल्या आहेत. पण पुस्तकाचा मुल उद्देश हा सुरु होती तो पंडितजी यांचे दुसरे लग्न झाल्यानंतर सौ सुनंदा आणि त्यांच्या मुलांना आलेला दुखद अनुभव व उपेक्षा. जो लेखकाने कुठलाही दुषित दृष्टीकोन न थेत ऐका त्रयस्थ माणसाने मांडावा असा मांडला आहे!! पण उपेक्षा मांडताना लेखकाच्या मनात असलेला आदरभाव हा कधीही लपलेला नाही आणि वेदनेत पण वडिलांबद्दल असलेला आदर हा कायम राहिला आहे. सावत्र भावंडाकडून आलेला कटू अनुभव पण सुयोग्य शब्दात लेखाने मांडला आहे!!

पंडितजी यांच्या शेवटच्या काही वर्षातील आयुष्याचे वर्णन मात्र वाचवत नाही आणि चाहत्यांना डोळ्यात प्पाणु नक्की आणेल!! पण लहानपणीची काही वर्ष सोडल्यास कायम उपेक्षित अनुभव आले असताना शेवटी मात्र नियती लेखावर हसली आणि लेखकाला ज्येष्ठ पुत्राचे कर्तव्य बजावण्यास मिळाले!! आणखीन किती लिहू?? 

हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर मी काही प्रतिक्रिया वाचल्या आणि ऐकल्या होत्या कि हे पुस्तक वाचू नये कारण पंडितजी यांच्याबद्दल असलेला आदर कमी होईल पण माझ्या अनुभवावरून सांगतो जात तुम्ही खरे चाहते किंवा भक्त असाल तर पंदित्जीन यांना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारलं आणि माझा स्वताचा यात्किंचीठी आदर कमी झाला नाही त्यामुळे खऱ्या चाहत्यांना विनंती आहे जे पुस्तक जरूर वाचा