खुदिराम बोस आणि सेनापती बापट
जेव्हा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन शहरात इंडिया हाउस घेतले आणि तेथे कित्येक विद्यार्थ्यांची राहायची सोय केली. लोकमान्य टिळकांची चिट्ठी घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर पण १९०६ साली तेथे गेले आणि त्यांच्या भोवती मातृभूमीच्या स्वातंत्र्याकरता तळमळणारे कित्येक तरुण जमले. त्यात ऐक होते पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट.
इंग्रज सरकार विरुद्ध जर लढा द्यायचा असेल तर शस्त्रविद्या आवश्यक आहे असे सावरकरांना वाटत होते व त्यांनी ऐक योजना मांडली सेनापती बापट आणि हेमचंद्र दास यांनी परिस येथे जाऊन बॉम्ब विद्या शिकावी. त्याप्रमाणे ते दोघेही परीसला रवाना झाले. त्यांना ऐक बोंब बनवायची ऐक रशियन भाषेतील पुस्तिका मिळाली आणि ऐका रशियन मैत्रिणीच्या मदतीने त्यांनी त्याचे इंग्रजीत भाषांतर केले. परत लंडनला येउन त्याचे प्रात्यक्षिक केले जे सफल ठरले. सावरकरांनी त्यांना या बॉम्बविद्येचा प्रसार करण्याकरता त्यांनी हिंदुस्थानात पाठवले. सेनापती बापट यांनी बंगालमध्ये स्वातंत्र्याकरता तळमळ असलेल्या काही तरुणांना ती विद्या दिली आणि कलकत्ता येथील माणिकतोळा भागात बोंब बनवले गेले. स्वातंत्र्याच्या प्रेरणेने पेटलेले दोन तरुण खुदिराम बोस आणि प्रफुल्ला चाकी यांनी बोंब फेकण्यासाठी किंग्सफोर्ड याची निवड केली. हा मुज्जफरपूरचा जिल्हा माज्यीस्ट्रेट होत आणि त्याने कित्येक क्रांतिकारक तरुणांना फासावर चढवले होते. ३० एप्रिल १९०८ रोजी या दोघांनी किंगफोर्डच्या गाडीवर बोंब फेकला पण दुर्दैव किंग्सफोर्ड गाडीत नव्हता या स्फोटात त्याचा सहकारी केनेडी, त्याची बायको आणि मुलगी ठार झाली.
खुदिराम बोस पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी २४ मैल धावले पण त्यांना अखेर पकडले गेले व इंग्रज सरकारने त्यांना फासावर चढवले. खुदिराम बोस यांच्या बलिदानाबद्दल बंगाली जनतेच्या मनात एवढा आदर होता त्यांच्या अंतयात्रेत हजारो माणसे गोळा झाले आणि त्यापैकी कित्येक लोकांनी चितेवरची राख आपल्या घरी नेउन देवघरात ठेवली आणि या राखेच्या प्रेरणेतून अनेक देशभक्त निर्माण व्हावेत हि त्यामागची भावना.
अश्या बंगालमधील मझ्या परिचयाच्या ऐका तरुणाला (आज वर साधारण ३०-३२ असेल) मी खुदिराम बोस यांच्याबद्दल काय महिती आहे का? असे विचारले तेव्हा त्याचे उत्तर कधी नाव ऐकले नाही असे होते. त्या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार बंगालमधील ३० वर्ष कम्युनिस्ट यांनी राज्य केले त्यांनी सगळ्या संस्कारांची वाट लावली.
आज महाराष्टात सेनापती बापट यांच्या नावाने रस्ते आहेत (निदान मुंबई आणि पुणे येथे आहेत इतर ठिकाणचे माहित नाही) त्यामुळे काही प्रमाणात त्यांची स्मृती जागी आहे पण आज महाराष्टातील किती तरुणांना सेनापती बापट यांच्या कार्याची त्रोटक माहिती असेल याबद्दल मला १००% शंका आहे.
तसेच खुदिराम बोस यांच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा बंगालमधील सध्याच्या जनतेच्या मानसिकतेचा विचार मनात येतो तेव्हा ममता बनर्जी सारख्या नतद्रष्ट आणि बांगला देशतील लोकांना अवैध पद्धतीने संरक्षण देऊन देश बुडवायला निघालेल्या (माल्डा प्रकरण जरूर आठवा) बाईला परत निवडून आणली याचे मला तरी कोडे नक्कीच आहे
जेव्हा हिंदुस्थानात पाठ्यपुस्तकात देशाकरता प्राणत्याग करणाऱ्या क्रांतीकारांचा उल्लेख अतिरेकी म्हणून होतो आणि लिहिणारे लोक त्याचे समर्थन करतात तेव्हा ऐक गोष्ट नक्कीच मनात येते आपण आपल्या देशात असल्या बेशरम लोकांना का सहन करतो?
जेव्हा राहुल गांधी सारख्या बिनडोक आणि कुचकामी (खरेतर येथे अपशब्द वापरण्याचा मोह टाळत आहे) माणसाचा धडा पुस्तकात असल्याची बातमी फेबु वर वाचली तेव्हा शरमेने मान नक्कीच झुकली!! मोदी सरकार आणि खासकरून स्मृती इराणी याकडे लक्ष्य देऊन योग्य गोष्ट करतील अशी अशा नक्कीच आहे. शेवटी येथे ऐक उर्दू शेर आठवत आहे
उम्मीद पेही दुनिया कायम है!!
शैलेश दामले
२१-मे-२०१६
(संदर्भ : मृत्युंजयाचा आत्मयज्ञ - लेखक वि श्री जोशी आणि भारतीय स्वातंत्र्य लढा : लेखक डॉक्टर अनिल गोडबोले)

No comments:
Post a Comment