पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
जेव्हा संपूर्ण हिंदुस्तान इंग्रजांनी व्यापला असताना सशस्त्र क्रांतीचा कैवार घेऊन लिहिणारा हिंदुस्थानच्या इतिहासात एकच नरसिंह होऊन गेला त्याचे नाव पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. १८५७ साली जेव्हा हिंदुस्थानात स्वातंत्र्याचा ऐक मोठा लढा सुरु असताना श्यामजी यांचा जन्म त्याच काळात व्हावा ऐक योगायोग.
मांडवी येथे कच्छ प्रांतात जन्मलेले श्यामजी शिक्षणाकरता मुंबईला आले. बालपणीच मातापित्याचे छत्र हरवले त्यामुळे त्यांनी हलाखीत दिवस काढून चार घरची धुणी आणि पाण्क्याचे काम करून आपले शालेय शिक्षण घेतले. त्या काळची प्रख्यात शाळा विल्सन हायस्कूल मध्ये शिकले. शालेयशिक्षणाच्या काळात त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला आणि प्राविण्य मिळवले त्यामुळे त्यांना तत्कालीन संस्कृत पंडितांकडून पंडित अशी पदवी दिली गेली. तसेच त्याकाळात त्याचा संबंध स्वामी दयानंद सरस्वती (आर्य समाजाचे संस्थापक) यांच्याशी आला व स्वामीजींचे शिष्यत्व श्यामजी यांनी पत्करले व त्यांच्या कडून वैदिक तत्वज्ञान शिकले.
१८७९ मध्ये श्यामजी पुढील शिक्षणाकरता ओक्सफोर्ड येथे आले तेथे BA झाले. व ओक्सफोर्ड येथेच संस्कृत अध्यापनाचे काम व जोडीने वकिलीचे शिक्षण घेत होते. १८८५ साली ते हिंदुस्थानात परत आले. काही दिवस रतलाम संस्थानाचे दिवाण म्हणून काम केले. पण तब्येत ठीक न राहिल्याने त्यांनी ते काम सोडले व अजमेर येथे स्थायिक झाले व तेथे वकिली करू लागले तसेच ते अजमेर नगरपालिकेचे पण ऐक सदस्य होते. नंतर काही दिवस उदयपुर आणि जुनागढ संस्थानाचे दिवाण म्हणून काम केले पण या सर्व काळात इंग्रज सरकारच्या दडपशाही धोरणाला कंटाळून हिंदुस्थानात राहून काही काम करता येणार नाही असे वाटून लंडनला परत जाण्याचा विचार करत होते. त्याच काळात त्यांचा संबंध लोकमान्य टिळक यांच्याशी आला. टिळकांच्या सहवासात त्यांचे मातृभूमीबद्दल असलेले सर्व विचार बदलले आणि त्यांनी ठरवले हिंदुस्थानच्या बाहेर राहून देह स्वतंत्र होण्यासाठी स्वतःला वाहून घ्यायचे.
तेव्हा १८९७ साली ते परत लंडनला आले. परत वकिली चालू केली वकिली करता करता मातृभूमीच्या दास्याचे दुखः स्वस्थ बसून देत नव्हते. त्यांनी १९०५ साली लंडनच्या मधयम वस्तीत ऐक इमारत घेऊन त्याला इंडिया हाउस असे नाव दिले व तेथे हिंदुस्थानातून आलेल्या विद्यार्थ्यांची राहायची सोय केली. तसेच इंडियन सोशलिस्ट नावाचे नियतकलिक ते चालवत असत त्यातून बरेचसे राजकीय लिखाण ते करत तसेच इंग्रंजांच्या हिंदुस्थानात होणार्या अत्याचाराबद्दल त्यात लिहित असत.
त्यांनी स्थापन केलेल्या इंडिया हौस मध्येच १९०६ साली वीर सावरकर लोकमान्य टिळकांचे शिफारसपत्र घेऊन आले. जसे चुंबकाला लोह लगेच येउन चिकटते त्याप्रमाणे इंडिया हाउस मध्ये मदनलाल धिंग्रा, व्ही व्ही एस अय्यर, मादाम कामा, सरदार सिंग राणा, लाल हरदयाळ, सेनापती बापट आणि इतर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य करण्याचे कल्पनेने झपाटलेले लोक एकत्र आले. जेव्हा इंडिया हाउस मधील क्रांतीकारकांच्या कारवाया जेव्हा उग्र स्वरूप धारण करू लागल्या तेव्हा श्यामजीना इंडिया हाउस नाईलाजास्तव बंद करावे लागले. नंतर १९०७ नंतर ते कधी परिस कधी अमेरिकेत काही आयर्लंड तर कधी स्वित्झर्लंड जेथे असतील तेथे हिंदुस्थानला स्वतंत्र करे या गोष्टीकरता त्यांनी जमवलेली सगळी दौलत आणि ताकद पणाला लावली व युरोपमध्ये ज्यांना हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याकरता लागेल ती मदत करत राहिले. अखेर तब्येतीने साथ दिली नाही १९३० साली पोटाच्या विकाराने त्यांनी जिनिव्हा येथे देह ठेवला व हिंदुस्थानला स्वतंत्र झालेले बघण्याचे स्वप्न त्यांच्या हयातीत अपुरे राहिले.
श्यामजी यांच्या कार्याला १९४७ नंतर कधीच प्रसिद्धी मिळाली नाही हे त्यांचे दुर्दैव. तसेच जिनिव्हा येथे असलेल्या त्यांच्या अस्थि परत आणण्याचे कार्य पण २००३ पर्यंत कोणाही राज्यकर्त्याच्या ध्यानात कधीच आले नाही. २००३ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना माननीय नरेंद्र मोदी यांनी त्याच्या अस्थि परत आणून श्यामजी यांची शेवटची इच्छा पुरी केली. तसेच २००३ साली कच्छ प्रांतातील भूज येथील विद्यापीठाला श्यामजी कृष्ण वर्मा हे नाव दिले. तसेच २०१० मांडवी येथे क्रांतितीर्थ मेमोरियल ची स्थापना करून त्यांच्या देशकार्याला योग्य श्रद्धांजली व्हायली.
अश्या श्यामजी कृष्ण वर्मा यांचे माझ्या मनात असलेला आदर हा लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांच्या बरोबरीने आहे. श्यामजी यांच्याबद्दल असलेला आदर हा निश्चित मोहनदास करमचंद गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा कितीतरी वरचा आहे.
शैलेश दामले १५-मे-२०१६
संदर्भ
भारतीय स्वातंत्र्याचा लढा - लेखक डॉक्टर अनिल गोडबोले
http://www.boloji.com/index.cfm?md=Content&sd=Articles&ArticleID=938
https://en.wikipedia.org/wiki/Shyamji_Krishna_Varma
http://thewire.in/2015/11/13/british-bar-reverses-historic-injustice-to-freedom-fighter-shyamji-krishna-varma-15530/

No comments:
Post a Comment