Saturday, May 21, 2016

राग ललित 

ऐक साक्लचा अत्यंत श्रवणीय राग. एखादा माणूस सकाळी कामाची सुरुवात ज्या उत्साहात करतो तोच उत्साह मला राग ललित मध्ये दिसतो!! कित्येक ज्ञानी लोकांनी हा राग समर्थपणे गायला किंवा वाजवला आहे

सुरुवात कै बापूराव पलुस्कर यांच्या पासून करूया. ग्वाल्हेर घराण्याची उत्तम खानदानी तालीम लाभलेले बापूराव अकाली गेले पण काही त्यांची ध्वनिमुद्रणे उपलब्ध आहेत
https://www.youtube.com/watch?v=2UdDBL--pBY

पै उस्ताद अमीर खान हे धीरगंभीर गायकी करता प्रसिद्ध होते त्यांच्या आवाजात ऐका
https://www.youtube.com/watch?v=yBU2J3SwFuc

एखादा राग कधी कै पंडित भीमसेन जोशी यांनी गायला आणि आपला ठसा उमटवला नाही असे झाले नाही. राग ललित त्यांच्या आवाजात. हे ध्वनिमुद्रण ऐका मैफालीचेच आहे.
https://www.youtube.com/watch?v=OESH4klM-N8

रामपूर आणि किराणा या दोन्ही घराण्याची तालीम लाभलेल्या महान गायिका परवीन सुलतान आपली आक्रमक तानाक्र्ता प्रसिद्ध आहेत त्यांच्या आवाजात ऐका
https://www.youtube.com/watch?v=I2kEL_Sgz_M


आजच्या युगातील प्रसिद्ध गायक उस्ताद रशीद खान यांच्या आवाजात ऐका
https://www.youtube.com/watch?v=QPkFff4DqKA


बासरी वाद्याकरता आज पंडित हरिप्रसाद चौरासिया जरी प्रसिद्ध असले तरी बासरीला शास्त्रीय संगीतात मन मिळवण्याचे खरे काम केले ते कै पंडित अमल्ज्योती उर्फ पन्नालाल घोष त्यांची जेव्हा बासरी वाजते तेव्हा ती थांबू नये असेच वाटते!!
https://www.youtube.com/watch?v=JP8mMTEvrQ8

कोणाची सतार गाते हा प्रश्न पडला तर माझ्या समोर दोन नवे लगेच येतात ती पै उस्ताद विलायत खान आणि उस्ताद रईस खान
त्या पैकी उस्ताद विलायत खान यांची सतार ऐका. ध्वनिमुद्रण ऐका मैफलीतील आहे
https://www.youtube.com/watch?v=CfnG4kPrUZ0

शहनाई सम्राट पै बिस्मिल्ला खान यांच्या सनईत ऐका.
https://www.youtube.com/watch?v=GDxVV60_RcU
आज जरी खांसाहेब जिवंत नसले तरी त्यांची उज्वल परंपरा त्यांचे शिष्य शैलेश भागवत उत्तम रीतीने पुढे नेत आहेत

कै पंडित रवि शंकर आणि पै उस्ताद आली अकबर खान यांची जुगलबंदी ऐका
https://www.youtube.com/watch?v=lr5XlY0v5ag

या रागाचा सुंदर उपयोग सुगम संगीतात पण केला आहे

आतून कीर्तन वरून तमाशा नावाचे फारसे न गाजलेल्या नाटकात कै विश्वनाथ मोरे यांनी या रागात उत्तम गणेश स्तुती बांधली आहे आणि रामदास कामत यांनी या चालीला उत्तम न्याय दिला आहे
https://www.youtube.com/watch?v=nYjAi_xW0nY

संगीत मृच्छकटिक अतिशय जुने नाटक या नाटकात पण ऐक उत्तम नाट्यगीत बांधले आहे ते ऐका कै जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात
https://www.youtube.com/watch?v=SikLYnL07hI
या गीतामध्ये सर्वात जाणवलेली गोष्ट म्हणजे बुवांचे अतिशय स्पष्ट उच्चार

पोस्टातली मुलगी या चित्रपटात कै बाबूजी यांनी ऐक सुरेख गीत बांधले आहे
https://www.youtube.com/watch?v=sWx7G1IpVt8

हिंदी चित्रपट सृष्टीत शास्त्रीय संगीताचा भरपूर उपयोग केलेले संगीतकार होते पै नौशाद त्यांनी लीडर या चित्रपटात ऐक गीत बांधले आहे
https://www.youtube.com/watch?v=TehJFYrDFJw

कै ओ पी नय्यर यांनी हा राग उत्तम प्रकारे वापरून ऐक गाणे कल्पना चित्रपट बांधले आहे
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=zQKdL0PnHxw

खुदिराम बोस आणि सेनापती बापट 

जेव्हा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन शहरात इंडिया हाउस घेतले आणि तेथे कित्येक विद्यार्थ्यांची राहायची सोय केली. लोकमान्य टिळकांची चिट्ठी घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर पण १९०६ साली तेथे गेले आणि त्यांच्या भोवती मातृभूमीच्या स्वातंत्र्याकरता तळमळणारे  कित्येक तरुण जमले. त्यात ऐक होते पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट.

इंग्रज सरकार विरुद्ध जर लढा द्यायचा असेल तर शस्त्रविद्या आवश्यक आहे असे सावरकरांना वाटत होते व त्यांनी ऐक योजना मांडली सेनापती बापट आणि हेमचंद्र दास यांनी परिस येथे जाऊन बॉम्ब विद्या शिकावी. त्याप्रमाणे ते दोघेही परीसला रवाना झाले. त्यांना ऐक बोंब बनवायची ऐक रशियन भाषेतील पुस्तिका मिळाली आणि ऐका रशियन मैत्रिणीच्या मदतीने त्यांनी त्याचे इंग्रजीत भाषांतर केले. परत लंडनला येउन त्याचे प्रात्यक्षिक केले जे सफल ठरले. सावरकरांनी त्यांना या बॉम्बविद्येचा प्रसार करण्याकरता त्यांनी हिंदुस्थानात पाठवले. सेनापती बापट यांनी बंगालमध्ये स्वातंत्र्याकरता तळमळ असलेल्या काही तरुणांना ती विद्या दिली आणि कलकत्ता येथील माणिकतोळा भागात बोंब बनवले गेले. स्वातंत्र्याच्या प्रेरणेने पेटलेले दोन तरुण खुदिराम बोस आणि प्रफुल्ला चाकी यांनी बोंब फेकण्यासाठी किंग्सफोर्ड याची निवड केली. हा मुज्जफरपूरचा जिल्हा माज्यीस्ट्रेट होत आणि त्याने कित्येक क्रांतिकारक तरुणांना फासावर चढवले होते. ३० एप्रिल १९०८ रोजी या दोघांनी किंगफोर्डच्या गाडीवर बोंब फेकला पण दुर्दैव किंग्सफोर्ड गाडीत नव्हता या स्फोटात त्याचा सहकारी केनेडी, त्याची बायको आणि मुलगी ठार झाली.

खुदिराम बोस पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी २४ मैल धावले पण त्यांना अखेर पकडले गेले व इंग्रज सरकारने त्यांना फासावर चढवले. खुदिराम बोस यांच्या बलिदानाबद्दल बंगाली जनतेच्या मनात एवढा आदर होता त्यांच्या अंतयात्रेत हजारो माणसे गोळा झाले आणि त्यापैकी कित्येक लोकांनी चितेवरची राख आपल्या घरी नेउन देवघरात ठेवली आणि या राखेच्या प्रेरणेतून अनेक देशभक्त निर्माण व्हावेत हि त्यामागची भावना.

अश्या बंगालमधील मझ्या परिचयाच्या ऐका तरुणाला (आज वर साधारण ३०-३२ असेल) मी खुदिराम बोस यांच्याबद्दल काय महिती आहे का? असे विचारले तेव्हा त्याचे उत्तर कधी नाव ऐकले नाही असे होते. त्या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार बंगालमधील ३० वर्ष कम्युनिस्ट यांनी राज्य केले त्यांनी सगळ्या संस्कारांची वाट लावली.

आज महाराष्टात सेनापती बापट यांच्या नावाने रस्ते आहेत (निदान मुंबई आणि पुणे येथे आहेत इतर ठिकाणचे माहित नाही) त्यामुळे काही प्रमाणात त्यांची स्मृती जागी आहे पण आज महाराष्टातील किती तरुणांना सेनापती बापट यांच्या कार्याची त्रोटक माहिती असेल याबद्दल मला १००% शंका आहे.

तसेच खुदिराम बोस यांच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा बंगालमधील सध्याच्या जनतेच्या मानसिकतेचा विचार मनात येतो तेव्हा ममता बनर्जी सारख्या नतद्रष्ट आणि बांगला देशतील लोकांना अवैध पद्धतीने संरक्षण देऊन देश बुडवायला निघालेल्या (माल्डा प्रकरण जरूर आठवा)  बाईला परत निवडून आणली याचे मला तरी कोडे नक्कीच आहे

जेव्हा हिंदुस्थानात पाठ्यपुस्तकात देशाकरता प्राणत्याग करणाऱ्या क्रांतीकारांचा उल्लेख अतिरेकी म्हणून होतो आणि लिहिणारे लोक त्याचे समर्थन करतात तेव्हा ऐक गोष्ट नक्कीच मनात येते आपण आपल्या देशात असल्या बेशरम लोकांना का सहन करतो?

जेव्हा राहुल गांधी सारख्या बिनडोक आणि कुचकामी (खरेतर येथे अपशब्द वापरण्याचा मोह टाळत आहे) माणसाचा धडा पुस्तकात असल्याची बातमी फेबु वर वाचली तेव्हा शरमेने मान नक्कीच झुकली!! मोदी सरकार आणि खासकरून स्मृती इराणी याकडे लक्ष्य देऊन योग्य गोष्ट करतील अशी अशा नक्कीच आहे. शेवटी येथे ऐक उर्दू शेर आठवत आहे

उम्मीद पेही दुनिया कायम है!!

शैलेश दामले
२१-मे-२०१६

(संदर्भ : मृत्युंजयाचा आत्मयज्ञ - लेखक वि श्री जोशी  आणि भारतीय स्वातंत्र्य लढा : लेखक डॉक्टर अनिल गोडबोले)

Sunday, May 15, 2016

पंडित श्यामजी कृष्ण वर्मा

जेव्हा संपूर्ण हिंदुस्तान इंग्रजांनी व्यापला असताना सशस्त्र क्रांतीचा कैवार घेऊन लिहिणारा हिंदुस्थानच्या इतिहासात एकच नरसिंह होऊन गेला त्याचे नाव पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. १८५७ साली जेव्हा हिंदुस्थानात स्वातंत्र्याचा ऐक मोठा लढा सुरु असताना श्यामजी यांचा जन्म त्याच काळात व्हावा ऐक योगायोग.

मांडवी येथे कच्छ प्रांतात जन्मलेले श्यामजी शिक्षणाकरता मुंबईला आले. बालपणीच मातापित्याचे छत्र हरवले त्यामुळे त्यांनी हलाखीत दिवस काढून चार घरची धुणी आणि पाण्क्याचे काम करून आपले शालेय शिक्षण घेतले. त्या काळची प्रख्यात शाळा विल्सन हायस्कूल मध्ये शिकले. शालेयशिक्षणाच्या काळात त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला आणि प्राविण्य मिळवले त्यामुळे त्यांना तत्कालीन संस्कृत पंडितांकडून पंडित अशी पदवी दिली गेली. तसेच त्याकाळात त्याचा संबंध स्वामी दयानंद सरस्वती (आर्य समाजाचे संस्थापक) यांच्याशी आला व स्वामीजींचे शिष्यत्व श्यामजी यांनी पत्करले व त्यांच्या कडून वैदिक तत्वज्ञान शिकले.

१८७९ मध्ये श्यामजी पुढील शिक्षणाकरता ओक्सफोर्ड येथे आले तेथे BA झाले. व ओक्सफोर्ड येथेच संस्कृत अध्यापनाचे काम व जोडीने वकिलीचे शिक्षण घेत  होते. १८८५ साली ते हिंदुस्थानात परत आले. काही दिवस रतलाम संस्थानाचे दिवाण म्हणून काम केले. पण तब्येत ठीक न राहिल्याने त्यांनी ते काम सोडले व अजमेर येथे स्थायिक झाले व तेथे वकिली करू लागले तसेच ते अजमेर नगरपालिकेचे पण ऐक सदस्य होते. नंतर काही दिवस उदयपुर आणि जुनागढ संस्थानाचे दिवाण म्हणून काम केले पण या सर्व काळात इंग्रज सरकारच्या दडपशाही धोरणाला कंटाळून हिंदुस्थानात राहून काही काम करता येणार नाही असे वाटून लंडनला परत जाण्याचा विचार करत होते. त्याच काळात त्यांचा संबंध लोकमान्य टिळक यांच्याशी आला. टिळकांच्या सहवासात त्यांचे मातृभूमीबद्दल असलेले सर्व विचार बदलले आणि त्यांनी ठरवले हिंदुस्थानच्या बाहेर राहून देह स्वतंत्र होण्यासाठी स्वतःला वाहून घ्यायचे.

तेव्हा १८९७ साली ते परत लंडनला आले. परत वकिली चालू केली वकिली करता करता मातृभूमीच्या दास्याचे दुखः स्वस्थ बसून देत नव्हते. त्यांनी १९०५ साली लंडनच्या मधयम वस्तीत ऐक इमारत घेऊन त्याला इंडिया हाउस असे नाव दिले व तेथे हिंदुस्थानातून आलेल्या विद्यार्थ्यांची राहायची सोय केली. तसेच इंडियन सोशलिस्ट नावाचे नियतकलिक ते चालवत असत त्यातून बरेचसे राजकीय लिखाण ते करत तसेच इंग्रंजांच्या हिंदुस्थानात होणार्या अत्याचाराबद्दल त्यात लिहित असत.

त्यांनी स्थापन केलेल्या इंडिया हौस मध्येच १९०६ साली वीर सावरकर लोकमान्य टिळकांचे शिफारसपत्र घेऊन आले. जसे चुंबकाला लोह लगेच येउन चिकटते त्याप्रमाणे इंडिया हाउस मध्ये मदनलाल धिंग्रा, व्ही व्ही एस अय्यर, मादाम कामा, सरदार सिंग राणा, लाल हरदयाळ, सेनापती बापट आणि इतर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य करण्याचे कल्पनेने झपाटलेले लोक एकत्र आले. जेव्हा इंडिया हाउस मधील क्रांतीकारकांच्या कारवाया जेव्हा उग्र स्वरूप धारण करू लागल्या तेव्हा श्यामजीना इंडिया हाउस नाईलाजास्तव बंद करावे लागले. नंतर १९०७ नंतर ते कधी परिस कधी अमेरिकेत काही आयर्लंड तर कधी स्वित्झर्लंड जेथे असतील तेथे हिंदुस्थानला स्वतंत्र करे या गोष्टीकरता त्यांनी जमवलेली सगळी दौलत आणि ताकद पणाला लावली व युरोपमध्ये ज्यांना हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याकरता लागेल ती मदत करत राहिले. अखेर तब्येतीने साथ दिली नाही १९३० साली पोटाच्या विकाराने त्यांनी जिनिव्हा येथे देह ठेवला व हिंदुस्थानला स्वतंत्र झालेले बघण्याचे स्वप्न त्यांच्या हयातीत अपुरे राहिले.

श्यामजी यांच्या कार्याला १९४७ नंतर कधीच प्रसिद्धी मिळाली नाही हे त्यांचे दुर्दैव. तसेच जिनिव्हा येथे असलेल्या त्यांच्या अस्थि परत आणण्याचे कार्य पण २००३ पर्यंत कोणाही राज्यकर्त्याच्या ध्यानात कधीच आले नाही. २००३ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना माननीय नरेंद्र मोदी यांनी त्याच्या अस्थि परत आणून श्यामजी यांची शेवटची इच्छा पुरी केली. तसेच २००३ साली कच्छ प्रांतातील भूज येथील विद्यापीठाला श्यामजी कृष्ण वर्मा हे नाव दिले. तसेच २०१० मांडवी येथे क्रांतितीर्थ मेमोरियल ची स्थापना करून त्यांच्या देशकार्याला योग्य श्रद्धांजली व्हायली.

अश्या श्यामजी कृष्ण वर्मा यांचे माझ्या मनात असलेला आदर हा लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांच्या बरोबरीने आहे. श्यामजी यांच्याबद्दल असलेला आदर हा निश्चित मोहनदास करमचंद गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा कितीतरी वरचा आहे.

शैलेश दामले १५-मे-२०१६
संदर्भ
भारतीय स्वातंत्र्याचा लढा - लेखक डॉक्टर अनिल गोडबोले
http://www.boloji.com/index.cfm?md=Content&sd=Articles&ArticleID=938
https://en.wikipedia.org/wiki/Shyamji_Krishna_Varma
http://thewire.in/2015/11/13/british-bar-reverses-historic-injustice-to-freedom-fighter-shyamji-krishna-varma-15530/

Saturday, May 14, 2016

पान खाये सैय्या हमारो 

पान खाये सैय्या हमारो

हे शब्द खरे तर कै  शैलेंद्र यांना सुचले कै दादाबर्मन यांच्याकडून. दादाबर्मन यांचा वेश बहुतेक वेळा कुर्ता आणि बंगाली धोतर असा असे आणि दिवसातून ठराविक वेळेला पान खात असत आणि कवीला ऐक कल्पना मिळाली जर पान खाल्ल्यानंतर जर मुखरस कुर्त्यावर पडला तर हि कल्पना शैलेंद्र यांनी आपल्या शब्दात मांडली.  वास्तविक हे गाणे बंदिनी या चित्रपटा करता लिहिले होते आणि बर्मनदा यांनी त्याला चाल पण दिली. पण बर्याच विचारान्ती असे ठरले गाण्याच्या शब्दाला लागणारे वातावरण बंदिनी सारख्या चित्रपटात नव्हते म्हणून हे गाणे बंदिनी चित्रपटात ठेवले नाही. नंतर हेच गाणे शैलेंद्र यांच्याकडे पडून राहिले.

जेव्हा शैलेंद्र यांनी तिसरी कसम हा चित्रपताची निर्मित करायला घेतली तेव्हा हे गाणे त्या चित्रपटात योग्य ठिकाणी वापरले. या चित्रपटाला वास्तविक बर्मनदा यांनी संगीत द्यावे अशी शैलेंद्र यांची खरी इच्छा होती. पण त्याकाळात चित्रपट व्यायसायिक एकमेकांचे जवळचे मित्र होते असे असताना तिसरी कासमची कथा शैलेंद्र यांनी राज कपूर यांना ऐकवली आणि राज कपूर यांना कथा आवडली आणि त्यात काम करायची इच्छा दर्शवली आणि राज कपूर यांचा चित्रपटात प्रवेश झाल्यामुळे बर्मनदा हे बाजूला फेकले गेले आणि राज कपूर यांच्या कंपूतील शंकर जयकिशन हे संगीतकार म्हणून आले. खरेतर शंकर आणि जयकिशन हे अगोदर चाल देत असत आणि कवी त्यावर शब्द लिहित असे पण शैलेंद्र यांनी आपले गायक मित्र मुकेश यांची  मदत घेऊन शंकर यांना पटवले कि या चित्रपटात हे लिहिलेले शब्द योग्य आहेत आणि शंकर यांनी तयार शब्दांना चाल द्यावी आणि काही प्रयत्न केल्यानंतर शंकर हे तयार झाले आणि त्यांनी अजरामर चाल दिली. माझ्या मते या गाण्याच्या यशात खरे श्रेय संगीतकाराचे कमी असून कवी शैलेंद्र गायिका आशा भोसले आणि पाड्यावर नृत्य आणि अभिनय केलेल्या वहिदा रहमान या तिघांचा वाट जास्त आहे!!

शैलेश दामले १५-मे-२०१६

शैलेश दामले १५-मे-२०१६