माझी सिंगापुरी खाद्ययात्रा
जेव्हा कित्येक वर्षांपूर्वी सिंगापूरला;आलो तेव्हा या देशाबद्दल मला आणि माझ्या घरच्या मंडळींना फारच कमी माहिती या देशात काय अन्न मिळते तेव्हा फक्त तामिळ लोक असल्यामुळे इडली आणि डोसा मिळतो एवढेच माहिती होते आणि तेव्हा मुंबईत तामिळ लोकांचे अन्न म्हणजे इडली डोसा एवढा समज (गैर) होता.
खव्वयेगिरी हि माझ्या रक्तातच आहे आणि खाण्याचे संस्कार मला माझ्या आई आणि वडिलांखेरीज माई मातुल आजी कै यमुनाबाई हरिभाऊ भागवत हिच्याकडून आला कोकणातले कित्येक पदार्थ ती आम्हाला (सर्व नातवंडांना) प्रेमानेकरून वाढत असे आणि आजही जेव्हा आठवण येते तेव्हा डोळ्यात पाणी उभे राहते. सुग्रण कशी असावी याचे माझ्या समोरील आदर्श उदाहरण माझी आजी
माझ्या समोर असलेली दुसरी सुग्रण म्हणजे माझी मामी कै सुहासिनी अनंत भागवत तिच्या सारखे आंब्याचे लोणचे कोणीही आजही बनवत नाही आणि चव आजही आठवते. काही व्यक्तींच्या हातात चव असते तशी माझ्या मामीचा हातात होती साधी मसुराची उसळ सुद्धा ती जेव्हा बनवत असे त्यालाही उत्तम चव असे
माझी आई कै अंजली अशोक दामले महाराष्ट्रीय पदार्था खेरीज गुजराती, उत्तर भारतीय तसेच दक्षिण भारतीय पदार्थ बनवत असे आणि मला स्वयंपाक करायची आवड तिला थोडी थोडी मदत करताना लागली जेव्हा मला सिंगापूरला नोकरी मिळाली तेव्हा मी येथे यायच्या अगोदर मला निदान आमटी भात करून माझे पोट भरता येईल एवढूही काळजी तिने घेतली होती
जेव्हा मी नोकरी निमित्त येथे आलो आणि पाठोपाठ एक वर्षाने सौ शलाका (माझी पत्नी) येथे आली तेव्हा आमचे वय लहान होते आणि मनात रुढीबद्दल थोडी बंडखोरीपण होती आणि आम्ही येथील hawker center तसेच मकडोनाल्डस आणि तत्सम ठिकाणी मिळणारे सगळे अन्न आम्ही खाल्ले अगदी पोर्क,बीफ, हरणाचे मास (मलेशियात मिळते), मगरीचे मास (crocodile meat ) पासून समुद्रत मिळणारे बहुतेक सागरी अन्न (sea food) असे विविध प्रकार खाउन झाले काही आवडले कित्येक परत खायची हिम्मत झाली नाही.
माझा आवडता खेळाडू मायकेल होल्डिंग याचा एकदा मी विद्यार्थी असताना मी एक मुलाखत वाचली होती त्या मुलाखतीत त्याने आवडता पदार्थ t-bone steak असा सांगितलं होता तेव्हा तो काय असतो हे काही समजले नाही पण येथे एकेकाळी Pondorossa नावाचे एक रेस्टोरंट होते तेथील मेनूमध्ये हा पदार्थ वाचला आणि लगेच खाऊन पण झाला आणि मला आणि शलाकाला तो एवढा आवडला पुढील कित्येक महिने आम्ही वरचेवर खात असू.
त्याकाळी एकापाठोपाठ काही प्रोजेक्ट्स लागले होते आणि नोकरीय बदल यामुळे मला दोन वर्ष सुट्टी घेऊन घरी (मुंबईला ) जाता आले नाही पण जेव्हा स्वगृही परत गेली आणि आईच्या हातचा वरणभात खाल्ला आणि आमच्या या साहसी (adventure) खाद्ययात्रेची भैरवी झाली. आईच्या वरण भातात एवढी शक्ती नक्कीच होती की मला परत t-bone steak खावे असे कधीच वाटले नाही. आजही जेव्हा आईचा वरणभात आठवतो तेव्हा डोळ्यात पाणी नक्कीच उभे राहते.
शैलेश दामले
सप्टेंबर ४, २०१६

No comments:
Post a Comment