Saturday, October 8, 2016

काँग्रेसचा भविष्यकाळ \

झी टीव्ही वरील ताल ठोक के चर्चासत्र दिनांकास ६-ऑकटोबर-२०१६
https://www.youtube.com/watch?v=reollHLLOi4
झी टीव्ही वरील ताल ठोक के चर्चासत्र दिनांकास ७-ऑकटोबर-२०१६
https://www.youtube.com/watch?v=QnTHPq13utw
वरील दोन्ही चर्चा संत्रात काँग्रेसची भूमिका? दोन्ही संत्रात काँग्रेसच्या प्रवक्त्याने इतका त्रागा केला आहे कि त्यांचे वक्तव्य ऐकून त्या प्रवक्त्याला दोन कानाखाली माराव्यात असे नक्की वाटते निदान मला तरी वाटले!!
पप्पूने खून की दलाली हा शब्दप्रेयोग बहुतेक मंडळींनी वाचला किंवा ऐकला असेल. २०१३ सालापासून मी पप्पूला ऐकत आलो आहे (काही मंडळी २००४ पासून ऐकत असतील) माझे स्पष्ट मत आहे पप्पूने आपले आडनाव बदलून बरळकर आडनाव ठेवावे त्या जास्त संयुक्तिक ठरेल
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पराजय झाल्यापासून पप्पू आणि त्याचे इतर काँग्रेसकन क्रीतपुत्र (विकत घेतलेले गुलाम पूज्य बाबासाहेब पुरंदरे यांचा शब्द उसना घेत आहे) यांची मानसिकता बघता. पप्पू खोट्या विश्वात राहाण्याचा मानसिक रोग (रोगाचे नाव मनोपचार तज्ज्ञ सांगू शकतील) झालेला आहे आणि तोच रोग हा रोग नक्की संसर्गजन्य आहे क्रॅब इतर काँग्रेसजन पण त्याने पछाडलेले दिसत आहेत!! हे चित्र बघता हिंदुस्थान काँग्रेसमुक्त नक्कीच होणार. कै नथुराम गोडसे यांची अखण्ड हिंदुस्थानी इच्छा अपुरी राहील असे दिसत आहे पण मो की गांधी यांची इच्छा स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करावी हि पुरी झली नाही पण काँग्रेस लयाला जाऊन एक अर्थाने त्यांची उच्च पुरीला होईल असे दिसत आहे आणि माझ्या मते काळाचीच गरज आहे!!
माननीय श्री शरद रावजी पवार साहेब बरळतात आमी पण पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हल्ले केले पण त्याचा गवगवा केले नाही.
तोंडात तर तंबाखूची रसाळ पोथी (कै ग दि माडगूळकर यांची क्षमा मागून त्यःचे शब्द उसने घेतो) असेल तर गवगवा कुठून करणार.? सत्तेत असताना अजित
पवार याना फक्त भ्रष्टाचार करायला आणि धरणात मुतायला वेळ होता तसेच इतर मंत्री फक्त भ्रष्टाचार करत होते मग वेळ कुठून असणार?
शैलेश दामले
०८-ऑकटोबर-२०१६

Friday, September 16, 2016

माझी सिंगापुरी खाद्ययात्रा

जेव्हा कित्येक वर्षांपूर्वी सिंगापूरला;आलो तेव्हा या देशाबद्दल मला आणि माझ्या घरच्या मंडळींना फारच कमी माहिती या देशात काय अन्न मिळते तेव्हा फक्त तामिळ लोक असल्यामुळे इडली आणि डोसा मिळतो एवढेच माहिती होते आणि तेव्हा मुंबईत तामिळ लोकांचे अन्न म्हणजे इडली डोसा एवढा समज (गैर) होता.

खव्वयेगिरी हि माझ्या रक्तातच आहे आणि खाण्याचे संस्कार मला माझ्या आई आणि वडिलांखेरीज माई मातुल आजी कै यमुनाबाई हरिभाऊ भागवत हिच्याकडून आला कोकणातले कित्येक पदार्थ ती आम्हाला (सर्व नातवंडांना) प्रेमानेकरून वाढत असे आणि आजही जेव्हा आठवण येते तेव्हा डोळ्यात पाणी उभे राहते. सुग्रण कशी असावी याचे माझ्या समोरील आदर्श उदाहरण माझी आजी

माझ्या समोर असलेली दुसरी सुग्रण म्हणजे माझी मामी कै सुहासिनी अनंत भागवत तिच्या सारखे आंब्याचे लोणचे कोणीही आजही बनवत नाही आणि चव आजही आठवते. काही व्यक्तींच्या हातात चव असते तशी माझ्या मामीचा हातात होती साधी मसुराची उसळ सुद्धा ती जेव्हा बनवत असे त्यालाही उत्तम चव असे

माझी आई कै अंजली अशोक दामले महाराष्ट्रीय पदार्था खेरीज गुजराती, उत्तर भारतीय तसेच दक्षिण भारतीय पदार्थ बनवत असे आणि मला स्वयंपाक करायची आवड तिला थोडी थोडी मदत करताना लागली जेव्हा मला सिंगापूरला नोकरी मिळाली तेव्हा मी येथे यायच्या अगोदर मला निदान आमटी भात करून माझे पोट भरता येईल एवढूही काळजी तिने घेतली होती

जेव्हा मी नोकरी निमित्त येथे आलो आणि पाठोपाठ एक वर्षाने सौ शलाका (माझी पत्नी) येथे आली तेव्हा आमचे वय लहान होते आणि मनात रुढीबद्दल थोडी बंडखोरीपण होती आणि आम्ही येथील hawker center तसेच मकडोनाल्डस आणि तत्सम ठिकाणी मिळणारे सगळे अन्न आम्ही खाल्ले अगदी पोर्क,बीफ, हरणाचे मास (मलेशियात मिळते), मगरीचे मास (crocodile meat ) पासून समुद्रत मिळणारे बहुतेक सागरी अन्न (sea food) असे विविध प्रकार खाउन  झाले काही आवडले कित्येक परत खायची हिम्मत झाली नाही.

माझा आवडता खेळाडू मायकेल होल्डिंग याचा एकदा मी विद्यार्थी असताना मी एक मुलाखत वाचली होती त्या मुलाखतीत त्याने आवडता पदार्थ t-bone steak असा सांगितलं होता तेव्हा तो काय असतो हे काही समजले नाही पण येथे एकेकाळी Pondorossa नावाचे एक रेस्टोरंट होते तेथील मेनूमध्ये हा पदार्थ वाचला आणि लगेच खाऊन पण झाला आणि मला आणि शलाकाला तो एवढा आवडला पुढील कित्येक महिने आम्ही वरचेवर खात असू.

त्याकाळी एकापाठोपाठ काही प्रोजेक्ट्स लागले होते आणि नोकरीय बदल यामुळे मला दोन वर्ष सुट्टी घेऊन घरी (मुंबईला ) जाता आले नाही पण जेव्हा स्वगृही परत गेली आणि आईच्या हातचा वरणभात खाल्ला आणि आमच्या या साहसी (adventure) खाद्ययात्रेची भैरवी झाली. आईच्या वरण भातात एवढी शक्ती नक्कीच होती की मला परत t-bone steak खावे असे कधीच वाटले नाही. आजही जेव्हा आईचा वरणभात आठवतो तेव्हा डोळ्यात पाणी नक्कीच उभे राहते.

शैलेश दामले
सप्टेंबर ४, २०१६
[11:24 AM, 9/17/2016] +65 9027 7945: श्री धनंजय कीर लिखित मूळचे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र वाचायला घेतले तेव्हा प्रस्तावनेत एक वाक्य सापडले ते येथे देत आहे

२६ फेब्रुवारी १९७५ रोजी पुणे येथे सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करताना फिल्डमार्शल सॅम माणेकशा म्हणाले मला आयुष्यात आणेल मानसन्मान मिळाले पण वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मान सैनिक म्हणून मिळला तो मी कधीच विसरणे शक्य नाही!!

जे वाक्य वाचताना गेलाय काही महिन्यात timesnow आणि झीन्यूज या वाहिनीवर चर्चेत काँग्रेसकडून जे गलिच्छ आरोप होते गेले ते आठवले. माणेकशा यंकय्या सारखा सैनिक ज्याच्या मनात सावरकर यांच्या बद्दल आदराची भावना आहे. हिंदुस्थान स्वतंत्र होण्याकत्या जेवढे शारीरिक कष्ट अंदमानात सावरकरांनी सोसले तेवढे कुठल्याही नेत्याने सोसले नाही अगदी मोहनदास करमचंद गांधी, जवाहरलाल नेहरू अगदी सरकार पटेल यांनीही एवढे शारीरिक कष्ट सोसले नाहीत. अंदमानात सावरकरांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तो वेगळाच असे असताना काँग्रेस जे गलिच्छ आरोप करत आहे ते बघताना २०१९ पर्यंत भारत हा काँग्रेसमुक्त झालाच पाहिजे!!                      
[11:44 AM, 9/17/2016] +65 9027 7945: माझी सिंगापुरी खाद्ययात्रा

जेव्हा कित्येक वर्षांपूर्वी सिंगापूरला;आलो तेव्हा या देशाबद्दल मला आणि माझ्या घरच्या मंडळींना फारच कमी माहिती या देशात काय अन्न मिळते तेव्हा फक्त तामिळ लोक असल्यामुळे इडली आणि डोसा मिळतो एवढेच माहिती होते आणि तेव्हा मुंबईत तामिळ लोकांचे अन्न म्हणजे इडली डोसा एवढा समज (गैर) होता.

खव्वयेगिरी हि माझ्या रक्तातच आहे आणि खाण्याचे संस्कार मला माझ्या आई आणि वडिलांखेरीज माई मातुल आजी कै यमुनाबाई हरिभाऊ भागवत हिच्याकडून आला कोकणातले कित्येक पदार्थ ती आम्हाला (सर्व नातवंडांना) प्रेमानेकरून वाढत असे आणि आजही जेव्हा आठवण येते तेव्हा डोळ्यात पाणी उभे राहते. सुग्रण कशी असावी याचे माझ्या समोरील आदर्श उदाहरण माझी आजी

माझ्या समोर असलेली दुसरी सुग्रण म्हणजे माझी मामी कै सुहासिनी अनंत भागवत तिच्या सारखे आंब्याचे लोणचे कोणीही आजही बनवत नाही आणि चव आजही आठवते. काही व्यक्तींच्या हातात चव असते तशी माझ्या मामीचा हातात होती साधी मसुराची उसळ सुद्धा ती जेव्हा बनवत असे त्यालाही उत्तम चव असे

माझी आई कै अंजली अशोक दामले महाराष्ट्रीय पदार्था खेरीज गुजराती, उत्तर भारतीय तसेच दक्षिण भारतीय पदार्थ बनवत असे आणि मला स्वयंपाक करायची आवड तिला थोडी थोडी मदत करताना लागली जेव्हा मला सिंगापूरला नोकरी मिळाली तेव्हा मी येथे यायच्या अगोदर मला निदान आमटी भात करून माझे पोट भरता येईल एवढूही काळजी तिने घेतली होती

जेव्हा मी नोकरी निमित्त येथे आलो आणि पाठोपाठ एक वर्षाने सौ शलाका (माझी पत्नी) येथे आली तेव्हा आमचे वय लहान होते आणि मनात रुढीबद्दल थोडी बंडखोरीपण होती आणि आम्ही येथील hawker center तसेच मकडोनाल्डस आणि तत्सम ठिकाणी मिळणारे सगळे अन्न आम्ही खाल्ले अगदी पोर्क,बीफ, हरणाचे मास (मलेशियात मिळते), मगरीचे मास (crocodile meat ) पासून समुद्रत मिळणारे बहुतेक सागरी अन्न (sea food) असे विविध प्रकार खाउन  झाले काही आवडले कित्येक परत खायची हिम्मत झाली नाही.

माझा आवडता खेळाडू मायकेल होल्डिंग याचा एकदा मी विद्यार्थी असताना मी एक मुलाखत वाचली होती त्या मुलाखतीत त्याने आवडता पदार्थ t-bone steak असा सांगितलं होता तेव्हा तो काय असतो हे काही समजले नाही पण येथे एकेकाळी Pondorossa नावाचे एक रेस्टोरंट होते तेथील मेनूमध्ये हा पदार्थ वाचला आणि लगेच खाऊन पण झाला आणि मला आणि शलाकाला तो एवढा आवडला पुढील कित्येक महिने आम्ही वरचेवर खात असू.

त्याकाळी एकापाठोपाठ काही प्रोजेक्ट्स लागले होते आणि नोकरीय बदल यामुळे मला दोन वर्ष सुट्टी घेऊन घरी (मुंबईला ) जाता आले नाही पण जेव्हा स्वगृही परत गेली आणि आईच्या हातचा वरणभात खाल्ला आणि आमच्या या साहसी (adventure) खाद्ययात्रेची भैरवी झाली. आईच्या वरण भातात एवढी शक्ती नक्कीच होती की मला परत t-bone steak खावे असे कधीच वाटले नाही. आजही जेव्हा आईचा वरणभात आठवतो तेव्हा डोळ्यात पाणी नक्कीच उभे राहते.

शैलेश दामले
सप्टेंबर ४, २०१६
काँग्रेसमुक्त भारत

श्री धनंजय कीर लिखित मूळचे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र वाचायला घेतले तेव्हा प्रस्तावनेत एक वाक्य सापडले ते येथे देत आहे

२६ फेब्रुवारी १९७५ रोजी पुणे येथे सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करताना फिल्डमार्शल सॅम माणेकशा म्हणाले मला आयुष्यात आणेल मानसन्मान मिळाले पण वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मान सैनिक म्हणून मिळला तो मी कधीच विसरणे शक्य नाही!!

जे वाक्य वाचताना गेलाय काही महिन्यात timesnow आणि झीन्यूज या वाहिनीवर चर्चेत काँग्रेसकडून जे गलिच्छ आरोप होते गेले ते आठवले. माणेकशा यंकय्या सारखा सैनिक ज्याच्या मनात सावरकर यांच्या बद्दल आदराची भावना आहे. हिंदुस्थान स्वतंत्र होण्याकत्या जेवढे शारीरिक कष्ट अंदमानात सावरकरांनी सोसले तेवढे कुठल्याही नेत्याने सोसले नाही अगदी मोहनदास करमचंद गांधी, जवाहरलाल नेहरू अगदी सरकार पटेल यांनीही एवढे शारीरिक कष्ट सोसले नाहीत. अंदमानात सावरकरांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तो वेगळाच असे असताना काँग्रेस जे गलिच्छ आरोप करत आहे ते बघताना २०१९ पर्यंत भारत हा काँग्रेसमुक्त झालाच पाहिजे!!
शैलेश दामले १७-सप्टेंबर-२०१६

Saturday, May 21, 2016

राग ललित 

ऐक साक्लचा अत्यंत श्रवणीय राग. एखादा माणूस सकाळी कामाची सुरुवात ज्या उत्साहात करतो तोच उत्साह मला राग ललित मध्ये दिसतो!! कित्येक ज्ञानी लोकांनी हा राग समर्थपणे गायला किंवा वाजवला आहे

सुरुवात कै बापूराव पलुस्कर यांच्या पासून करूया. ग्वाल्हेर घराण्याची उत्तम खानदानी तालीम लाभलेले बापूराव अकाली गेले पण काही त्यांची ध्वनिमुद्रणे उपलब्ध आहेत
https://www.youtube.com/watch?v=2UdDBL--pBY

पै उस्ताद अमीर खान हे धीरगंभीर गायकी करता प्रसिद्ध होते त्यांच्या आवाजात ऐका
https://www.youtube.com/watch?v=yBU2J3SwFuc

एखादा राग कधी कै पंडित भीमसेन जोशी यांनी गायला आणि आपला ठसा उमटवला नाही असे झाले नाही. राग ललित त्यांच्या आवाजात. हे ध्वनिमुद्रण ऐका मैफालीचेच आहे.
https://www.youtube.com/watch?v=OESH4klM-N8

रामपूर आणि किराणा या दोन्ही घराण्याची तालीम लाभलेल्या महान गायिका परवीन सुलतान आपली आक्रमक तानाक्र्ता प्रसिद्ध आहेत त्यांच्या आवाजात ऐका
https://www.youtube.com/watch?v=I2kEL_Sgz_M

आजच्या युगातील प्रसिद्ध गायक उस्ताद रशीद खान यांच्या आवाजात ऐका
https://www.youtube.com/watch?v=QPkFff4DqKA

बासरी वाद्याकरता आज पंडित हरिप्रसाद चौरासिया जरी प्रसिद्ध असले तरी बासरीला शास्त्रीय संगीतात मन मिळवण्याचे खरे काम केले ते कै पंडित अमल्ज्योती उर्फ पन्नालाल घोष त्यांची जेव्हा बासरी वाजते तेव्हा ती थांबू नये असेच वाटते!!
https://www.youtube.com/watch?v=JP8mMTEvrQ8

कोणाची सतार गाते हा प्रश्न पडला तर माझ्या समोर दोन नवे लगेच येतात ती पै उस्ताद विलायत खान आणि उस्ताद रईस खान
त्या पैकी उस्ताद विलायत खान यांची सतार ऐका. ध्वनिमुद्रण ऐका मैफलीतील आहे
https://www.youtube.com/watch?v=CfnG4kPrUZ0

शहनाई सम्राट पै बिस्मिल्ला खान यांच्या सनईत ऐका.
https://www.youtube.com/watch?v=GDxVV60_RcU
आज जरी खांसाहेब जिवंत नसले तरी त्यांची उज्वल परंपरा त्यांचे शिष्य शैलेश भागवत उत्तम रीतीने पुढे नेत आहेत

कै पंडित रवि शंकर आणि पै उस्ताद आली अकबर खान यांची जुगलबंदी ऐका
https://www.youtube.com/watch?v=lr5XlY0v5ag

या रागाचा सुंदर उपयोग सुगम संगीतात पण केला आहे

आतून कीर्तन वरून तमाशा नावाचे फारसे न गाजलेल्या नाटकात कै विश्वनाथ मोरे यांनी या रागात उत्तम गणेश स्तुती बांधली आहे आणि रामदास कामत यांनी या चालीला उत्तम न्याय दिला आहे
https://www.youtube.com/watch?v=nYjAi_xW0nY

संगीत मृच्छकटिक अतिशय जुने नाटक या नाटकात पण ऐक उत्तम नाट्यगीत बांधले आहे ते ऐका कै जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात
https://www.youtube.com/watch?v=SikLYnL07hI
या गीतामध्ये सर्वात जाणवलेली गोष्ट म्हणजे बुवांचे अतिशय स्पष्ट उच्चार

पोस्टातली मुलगी या चित्रपटात कै बाबूजी यांनी ऐक सुरेख गीत बांधले आहे
https://www.youtube.com/watch?v=sWx7G1IpVt8

हिंदी चित्रपट सृष्टीत शास्त्रीय संगीताचा भरपूर उपयोग केलेले संगीतकार होते पै नौशाद त्यांनी लीडर या चित्रपटात ऐक गीत बांधले आहे
https://www.youtube.com/watch?v=TehJFYrDFJw

कै ओ पी नय्यर यांनी हा राग उत्तम प्रकारे वापरून ऐक गाणे कल्पना चित्रपट बांधले आहे
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=zQKdL0PnHxw

खुदिराम बोस आणि सेनापती बापट 

जेव्हा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन शहरात इंडिया हाउस घेतले आणि तेथे कित्येक विद्यार्थ्यांची राहायची सोय केली. लोकमान्य टिळकांची चिट्ठी घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर पण १९०६ साली तेथे गेले आणि त्यांच्या भोवती मातृभूमीच्या स्वातंत्र्याकरता तळमळणारे  कित्येक तरुण जमले. त्यात ऐक होते पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट.

इंग्रज सरकार विरुद्ध जर लढा द्यायचा असेल तर शस्त्रविद्या आवश्यक आहे असे सावरकरांना वाटत होते व त्यांनी ऐक योजना मांडली सेनापती बापट आणि हेमचंद्र दास यांनी परिस येथे जाऊन बॉम्ब विद्या शिकावी. त्याप्रमाणे ते दोघेही परीसला रवाना झाले. त्यांना ऐक बोंब बनवायची ऐक रशियन भाषेतील पुस्तिका मिळाली आणि ऐका रशियन मैत्रिणीच्या मदतीने त्यांनी त्याचे इंग्रजीत भाषांतर केले. परत लंडनला येउन त्याचे प्रात्यक्षिक केले जे सफल ठरले. सावरकरांनी त्यांना या बॉम्बविद्येचा प्रसार करण्याकरता त्यांनी हिंदुस्थानात पाठवले. सेनापती बापट यांनी बंगालमध्ये स्वातंत्र्याकरता तळमळ असलेल्या काही तरुणांना ती विद्या दिली आणि कलकत्ता येथील माणिकतोळा भागात बोंब बनवले गेले. स्वातंत्र्याच्या प्रेरणेने पेटलेले दोन तरुण खुदिराम बोस आणि प्रफुल्ला चाकी यांनी बोंब फेकण्यासाठी किंग्सफोर्ड याची निवड केली. हा मुज्जफरपूरचा जिल्हा माज्यीस्ट्रेट होत आणि त्याने कित्येक क्रांतिकारक तरुणांना फासावर चढवले होते. ३० एप्रिल १९०८ रोजी या दोघांनी किंगफोर्डच्या गाडीवर बोंब फेकला पण दुर्दैव किंग्सफोर्ड गाडीत नव्हता या स्फोटात त्याचा सहकारी केनेडी, त्याची बायको आणि मुलगी ठार झाली.

खुदिराम बोस पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी २४ मैल धावले पण त्यांना अखेर पकडले गेले व इंग्रज सरकारने त्यांना फासावर चढवले. खुदिराम बोस यांच्या बलिदानाबद्दल बंगाली जनतेच्या मनात एवढा आदर होता त्यांच्या अंतयात्रेत हजारो माणसे गोळा झाले आणि त्यापैकी कित्येक लोकांनी चितेवरची राख आपल्या घरी नेउन देवघरात ठेवली आणि या राखेच्या प्रेरणेतून अनेक देशभक्त निर्माण व्हावेत हि त्यामागची भावना.

अश्या बंगालमधील मझ्या परिचयाच्या ऐका तरुणाला (आज वर साधारण ३०-३२ असेल) मी खुदिराम बोस यांच्याबद्दल काय महिती आहे का? असे विचारले तेव्हा त्याचे उत्तर कधी नाव ऐकले नाही असे होते. त्या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार बंगालमधील ३० वर्ष कम्युनिस्ट यांनी राज्य केले त्यांनी सगळ्या संस्कारांची वाट लावली.

आज महाराष्टात सेनापती बापट यांच्या नावाने रस्ते आहेत (निदान मुंबई आणि पुणे येथे आहेत इतर ठिकाणचे माहित नाही) त्यामुळे काही प्रमाणात त्यांची स्मृती जागी आहे पण आज महाराष्टातील किती तरुणांना सेनापती बापट यांच्या कार्याची त्रोटक माहिती असेल याबद्दल मला १००% शंका आहे.

तसेच खुदिराम बोस यांच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा बंगालमधील सध्याच्या जनतेच्या मानसिकतेचा विचार मनात येतो तेव्हा ममता बनर्जी सारख्या नतद्रष्ट आणि बांगला देशतील लोकांना अवैध पद्धतीने संरक्षण देऊन देश बुडवायला निघालेल्या (माल्डा प्रकरण जरूर आठवा)  बाईला परत निवडून आणली याचे मला तरी कोडे नक्कीच आहे

जेव्हा हिंदुस्थानात पाठ्यपुस्तकात देशाकरता प्राणत्याग करणाऱ्या क्रांतीकारांचा उल्लेख अतिरेकी म्हणून होतो आणि लिहिणारे लोक त्याचे समर्थन करतात तेव्हा ऐक गोष्ट नक्कीच मनात येते आपण आपल्या देशात असल्या बेशरम लोकांना का सहन करतो?

जेव्हा राहुल गांधी सारख्या बिनडोक आणि कुचकामी (खरेतर येथे अपशब्द वापरण्याचा मोह टाळत आहे) माणसाचा धडा पुस्तकात असल्याची बातमी फेबु वर वाचली तेव्हा शरमेने मान नक्कीच झुकली!! मोदी सरकार आणि खासकरून स्मृती इराणी याकडे लक्ष्य देऊन योग्य गोष्ट करतील अशी अशा नक्कीच आहे. शेवटी येथे ऐक उर्दू शेर आठवत आहे

उम्मीद पेही दुनिया कायम है!!

शैलेश दामले
२१-मे-२०१६

(संदर्भ : मृत्युंजयाचा आत्मयज्ञ - लेखक वि श्री जोशी  आणि भारतीय स्वातंत्र्य लढा : लेखक डॉक्टर अनिल गोडबोले)

Sunday, May 15, 2016

पंडित श्यामजी कृष्ण वर्मा

जेव्हा संपूर्ण हिंदुस्तान इंग्रजांनी व्यापला असताना सशस्त्र क्रांतीचा कैवार घेऊन लिहिणारा हिंदुस्थानच्या इतिहासात एकच नरसिंह होऊन गेला त्याचे नाव पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. १८५७ साली जेव्हा हिंदुस्थानात स्वातंत्र्याचा ऐक मोठा लढा सुरु असताना श्यामजी यांचा जन्म त्याच काळात व्हावा ऐक योगायोग.

मांडवी येथे कच्छ प्रांतात जन्मलेले श्यामजी शिक्षणाकरता मुंबईला आले. बालपणीच मातापित्याचे छत्र हरवले त्यामुळे त्यांनी हलाखीत दिवस काढून चार घरची धुणी आणि पाण्क्याचे काम करून आपले शालेय शिक्षण घेतले. त्या काळची प्रख्यात शाळा विल्सन हायस्कूल मध्ये शिकले. शालेयशिक्षणाच्या काळात त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला आणि प्राविण्य मिळवले त्यामुळे त्यांना तत्कालीन संस्कृत पंडितांकडून पंडित अशी पदवी दिली गेली. तसेच त्याकाळात त्याचा संबंध स्वामी दयानंद सरस्वती (आर्य समाजाचे संस्थापक) यांच्याशी आला व स्वामीजींचे शिष्यत्व श्यामजी यांनी पत्करले व त्यांच्या कडून वैदिक तत्वज्ञान शिकले.

१८७९ मध्ये श्यामजी पुढील शिक्षणाकरता ओक्सफोर्ड येथे आले तेथे BA झाले. व ओक्सफोर्ड येथेच संस्कृत अध्यापनाचे काम व जोडीने वकिलीचे शिक्षण घेत  होते. १८८५ साली ते हिंदुस्थानात परत आले. काही दिवस रतलाम संस्थानाचे दिवाण म्हणून काम केले. पण तब्येत ठीक न राहिल्याने त्यांनी ते काम सोडले व अजमेर येथे स्थायिक झाले व तेथे वकिली करू लागले तसेच ते अजमेर नगरपालिकेचे पण ऐक सदस्य होते. नंतर काही दिवस उदयपुर आणि जुनागढ संस्थानाचे दिवाण म्हणून काम केले पण या सर्व काळात इंग्रज सरकारच्या दडपशाही धोरणाला कंटाळून हिंदुस्थानात राहून काही काम करता येणार नाही असे वाटून लंडनला परत जाण्याचा विचार करत होते. त्याच काळात त्यांचा संबंध लोकमान्य टिळक यांच्याशी आला. टिळकांच्या सहवासात त्यांचे मातृभूमीबद्दल असलेले सर्व विचार बदलले आणि त्यांनी ठरवले हिंदुस्थानच्या बाहेर राहून देह स्वतंत्र होण्यासाठी स्वतःला वाहून घ्यायचे.

तेव्हा १८९७ साली ते परत लंडनला आले. परत वकिली चालू केली वकिली करता करता मातृभूमीच्या दास्याचे दुखः स्वस्थ बसून देत नव्हते. त्यांनी १९०५ साली लंडनच्या मधयम वस्तीत ऐक इमारत घेऊन त्याला इंडिया हाउस असे नाव दिले व तेथे हिंदुस्थानातून आलेल्या विद्यार्थ्यांची राहायची सोय केली. तसेच इंडियन सोशलिस्ट नावाचे नियतकलिक ते चालवत असत त्यातून बरेचसे राजकीय लिखाण ते करत तसेच इंग्रंजांच्या हिंदुस्थानात होणार्या अत्याचाराबद्दल त्यात लिहित असत.

त्यांनी स्थापन केलेल्या इंडिया हौस मध्येच १९०६ साली वीर सावरकर लोकमान्य टिळकांचे शिफारसपत्र घेऊन आले. जसे चुंबकाला लोह लगेच येउन चिकटते त्याप्रमाणे इंडिया हाउस मध्ये मदनलाल धिंग्रा, व्ही व्ही एस अय्यर, मादाम कामा, सरदार सिंग राणा, लाल हरदयाळ, सेनापती बापट आणि इतर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य करण्याचे कल्पनेने झपाटलेले लोक एकत्र आले. जेव्हा इंडिया हाउस मधील क्रांतीकारकांच्या कारवाया जेव्हा उग्र स्वरूप धारण करू लागल्या तेव्हा श्यामजीना इंडिया हाउस नाईलाजास्तव बंद करावे लागले. नंतर १९०७ नंतर ते कधी परिस कधी अमेरिकेत काही आयर्लंड तर कधी स्वित्झर्लंड जेथे असतील तेथे हिंदुस्थानला स्वतंत्र करे या गोष्टीकरता त्यांनी जमवलेली सगळी दौलत आणि ताकद पणाला लावली व युरोपमध्ये ज्यांना हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याकरता लागेल ती मदत करत राहिले. अखेर तब्येतीने साथ दिली नाही १९३० साली पोटाच्या विकाराने त्यांनी जिनिव्हा येथे देह ठेवला व हिंदुस्थानला स्वतंत्र झालेले बघण्याचे स्वप्न त्यांच्या हयातीत अपुरे राहिले.

श्यामजी यांच्या कार्याला १९४७ नंतर कधीच प्रसिद्धी मिळाली नाही हे त्यांचे दुर्दैव. तसेच जिनिव्हा येथे असलेल्या त्यांच्या अस्थि परत आणण्याचे कार्य पण २००३ पर्यंत कोणाही राज्यकर्त्याच्या ध्यानात कधीच आले नाही. २००३ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना माननीय नरेंद्र मोदी यांनी त्याच्या अस्थि परत आणून श्यामजी यांची शेवटची इच्छा पुरी केली. तसेच २००३ साली कच्छ प्रांतातील भूज येथील विद्यापीठाला श्यामजी कृष्ण वर्मा हे नाव दिले. तसेच २०१० मांडवी येथे क्रांतितीर्थ मेमोरियल ची स्थापना करून त्यांच्या देशकार्याला योग्य श्रद्धांजली व्हायली.

अश्या श्यामजी कृष्ण वर्मा यांचे माझ्या मनात असलेला आदर हा लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांच्या बरोबरीने आहे. श्यामजी यांच्याबद्दल असलेला आदर हा निश्चित मोहनदास करमचंद गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा कितीतरी वरचा आहे.

शैलेश दामले १५-मे-२०१६
संदर्भ
भारतीय स्वातंत्र्याचा लढा - लेखक डॉक्टर अनिल गोडबोले
http://www.boloji.com/index.cfm?md=Content&sd=Articles&ArticleID=938
https://en.wikipedia.org/wiki/Shyamji_Krishna_Varma
http://thewire.in/2015/11/13/british-bar-reverses-historic-injustice-to-freedom-fighter-shyamji-krishna-varma-15530/